सलग दोन टर्म खासदार असलेल्या लोकप्रतिनिधींनी किती विकासकामे केली, याचा जनतेला हिशोब द्यावा, असे आव्हान म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना दिले दिले.
करडे (ता. शिरूर) येथे सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राऊंड गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना शिरूर पोलिसांच्या डीबी पथकाने अवघ्या ७२ तासांत परजिल्ह्यातून अटक केली आहे.
'सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकेत शिरूरच्या अवघ्या नऊ वर्षांच्या अनघा अश्विनी प्रसाद शिंदे हिची निवड झाल्याने शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात तसेच वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ शिरूर वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सोमवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
खेड आणि शिरूर तालुक्यांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या चासकमान धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने तब्बल ३४ वर्षांपूर्वी जलाशयात गेलेल्या जुन्या वाडा गावाचे अवशेष पुन्हा एकदा उघडकीस येऊ लागले आहेत.
शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने व एकदिलाने लढविण्याचा निर्धार पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे मतदारसंघातून गायब असल्याची चर्चा रंगत असतानाच ते ‘मिसळ पार्टी’त दिसल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खमंग पण तितकीच संतप्त चर्चा रंगली आहे.
ऑक्टोबर-2025 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असतानाही शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शिरूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याशी समन्वय वाढला आहे. यामुळे मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
आरोग्य विभागाच्या मदतीने गुन्हे शाखेच्या पथकाने याठिकाणी छापा टाकत कारवाई केली. याप्रकरणी डॉक्टरसह एजंटला अटक केली असून, त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ZP Election 2026: मागील निवडणुकीत सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले होते, तर एका जागेवर लोकशाही क्रांती आघाडीचा उमेदवार विजयी झाला होता.
शिरुर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येत घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. नेत्यांचे मनोमिलन मात्र कार्यकर्ते संभ्रमात अशी स्थिती निर्माण झाली आहे.
Leopard News: सदर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सदर परिसरातील पांजरपोळ भागात एक व बाजूला दोन पिंजरे लावण्यात आलेले असून बिबट्याचा ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शोध घेण्यात येणार आहे.
मागील महिन्यात ३ बळी गेल्यानंतर वन विभाग अलर्ट मोडवर असून बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ज्या काही महत्वाच्या उपाय योजना करता येतील त्या प्राधान्याने बिबट प्रवण क्षेत्रात राबविताना दिसत आहे.