Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाईच्या गोठ्यात शॉक लागून दोन महिलांसह एका गायीचा मृत्यू; माळशिरस येथील घटना

गोठ्यात गेल्यानंतर गाईला शॉक लागून ती खाली पडलेली दिसली. गाईला उठवण्याचा प्रयत्न करत असताना रशिका रेडे यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 07, 2025 | 11:03 AM
रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

अकलुज : माळशिरस तालुक्यातील महाळुंग ढवळे वस्ती येथे गायीच्या गोठ्यात शॉक लागून दोन महिलांसह एका जर्शी गायीचा मृत्यू झाला. बुधवारी रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे गाईच्या गोठ्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे दोन महिलांसह एका जर्शी गाईचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या दुर्दैवी घटनेत रशिका विठ्ठल रेडे (वय 57), सुवर्णा अमोल रेडे (वय 27), एक जर्शी गाय असे मृत पावले आहेत.

सकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास रशिका रेडे यांनी नेहमीप्रमाणे गाईच्या गोठ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. गोठ्यात गेल्यानंतर गाईला शॉक लागून ती खाली पडलेली दिसली. गाईला उठवण्याचा प्रयत्न करत असताना रशिका रेडे यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळात सुवर्णा रेडे या परिस्थिती पाहण्यासाठी गोठ्यात गेल्या. मात्र, त्याही विजेच्या संपर्कात आल्या आणि त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेचे कारण अद्याप तपासाअंती स्पष्ट व्हायचे आहे. मात्र, रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोठ्याच्या पत्राशेडमध्ये पाणी साचून, तिथे शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण घटनेचा तपास अकलूज पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी दीपक भोसले करत असून, घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. ही घटना संपूर्ण गावाला हादरवून गेली असून, एकाच कुटुंबातील दोन महिलांचा व एक जिवंत गाईचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

अमरावतीत दोन चिमुकल्यांचा मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत, अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. यात कुलरचा शॉक लागल्याने आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक येथे ही घटना घडली. कुलरमध्ये पाणी टाकताना हा विद्युत शॉक लागल्याचे समोर आले. सुमती लक्ष्मण कासदेकर (वय 35) श्वेता लक्ष्मण कासदेकर (वय 4) आणि विकी लक्ष्मण कासदेकर (वय 3) अशी मृतांची नावे आहेत.

Web Title: Two women and a cow die after getting shocked in a cowshed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 10:59 AM

Topics:  

  • maharashtra news

संबंधित बातम्या

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
1

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार
2

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू
3

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू

Maharashtra Weather:  राज्यात दुष्काळाची घोषणा, पण आभाळ पुन्हा बरसणार! ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
4

Maharashtra Weather: राज्यात दुष्काळाची घोषणा, पण आभाळ पुन्हा बरसणार! ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.