Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uday Samant on Uddhav Thackeray: रत्नागिरीतून उद्धव सेनेला ट्रेलर दाखवणार; उदय सामंतांचा ठाकरेंना इशारा

उद्धव गटातील चार आमदार आणि तीन खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होणार आहेत. त्यांनी रत्नागिरीत याचा पहिला ट्रेलर दाखवणार असल्याचेही जाहीर केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 24, 2025 | 11:03 AM
Uday Samant on Uddhav Thackeray: रत्नागिरीतून उद्धव सेनेला ट्रेलर दाखवणार;  उदय सामंतांचा ठाकरेंना इशारा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:   राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी उदय सामंत शिंदे गटातून बाहेर पडणार, आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  बाजूला करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण उदय सामंतर यांनी या चर्चा फेटाळून लावत आपण एकनाथ शिंदे यांच्या सोबतच राहणार असल्याचे सांगितले. पण त्यातच उदय सामंत यांनी आता थेट ठाकरे गट फुटणार असल्याचा दावा केला आहे.

ठाकरे गटाने उदय सामंत शिंदे गट फोडणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या दाव्याला खोडून काढत, शिंदे आणि आपल्यात भांडणं लावण्याचा हा केवळ पोरखेळ असल्याचे सांगितले. उलट, उद्धव सेनेलाच भगदाड पडणार असल्याचे प्रत्युत्तर देत त्यांनी त्यांच्या भूमिकेची ठाम जाहीरात केली. परदेशातून परतल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे गटाला थेट अल्टिमेटम दिला आणि रत्नागिरीतून उद्धव सेनेला ट्रेलर दाखवण्याचा इशारा दिला.

स्ट्रीट स्टाईल दही सामोसा चाट आता घरीच बनवा, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट;

चार आमदार आणि तीन खासदार शिंदे गटात सामील होणार?

विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरे गटातील नेते शिंदे गटाकडे येणार असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. त्यांच्यानुसार, उद्धव गटातील चार आमदार आणि तीन खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होणार आहेत. त्यांनी रत्नागिरीत याचा पहिला ट्रेलर दाखवणार असल्याचेही जाहीर केले. फक्त उद्धव सेना नव्हे, तर काँग्रेसलाही मोठा धक्का देणार असल्याचा दावा त्यांनी केला. रत्नागिरीत पक्षप्रवेशासाठी जय्यत तयारी सुरू असून, आगामी घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत आज रत्नागिरीतून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देणार आहेत. त्यांच्या मते, उद्धव सेनेतील जवळपास 450 कार्यकर्ते आज पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामध्ये तालुकाप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, सरपंच, उपसरपंच अशा विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हा पक्षप्रवेश कार्यक्रम दुपारी 12 वाजता होणार आहे.

Virender Sehwag: ‘बचपन का प्यार’,17 वर्ष मैत्री; घरून लग्नासाठी प्रखर विरोध विरेंद्र

उद्धव ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, उपविभाग प्रमुख दत्ता तांबे, विभाग प्रमुख अप्पा घाणेकर, पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, आणि विभाग प्रमुख महेंद्र झापडेकर हे शिंदे सेनेत सामील होणार असल्याचे जाहीर झाले आहे. मात्र, रत्नागिरीतील मोठ्या नेत्यांचा या पक्षप्रवेशात समावेश होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

चार आमदार, तीन खासदारांचे नाव अजून गुलदस्त्यात

उदय सामंत यांनी शिंदे गटात सामील होणाऱ्या चार आमदार आणि तीन खासदारांची नावे अद्याप उघड केलेली नाहीत. तसेच, काँग्रेसमधून कोण नेते सामील होणार याबाबतही स्पष्टता नाही. कालच्या उद्धव सेना आणि शिंदे सेनेच्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी अनुपस्थिती दर्शवल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

IPL 2025 पूर्वी एमएस धोनीने घेतले माता राणीचे दर्शन, रांचीच्या या मंदिराला दिली भेट

Web Title: Uday samant warns thackeray that he will show trailer to uddhav sena from ratnagiri nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 10:57 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.