विरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावतची लव्ह स्टोरी
टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग बराच काळ भारतासाठी क्रिकेट खेळला. जोपर्यंत सेहवाग क्रिकेट खेळत होता, तोपर्यंत त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले होते. सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये 2 त्रिशतके झळकावण्याचा विक्रम केला होता. याशिवाय सेहवाग त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत राहिला.
2004 मध्ये सेहवागने त्याची बालपणीची मैत्रीण आरती अहलावतशी लग्न केले. खरं तर आरती ही त्याच्या नात्यातीलच एक आहे आणि म्हणून या दोघांच्या लग्नालाही घरून विरोध होता असं सांगण्यात येते. त्या दोघांची प्रेमकहाणी कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत (फोटो सौजन्य – Instagram)
प्रपोज करण्यासाठी 14 वर्ष
लहानपणापासून होती ओळख
वीरेंद्र सेहवाग आणि आरती लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. जेव्हा सेहवागने आरतीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो 7 वर्षांचा होता आणि आरती 5 वर्षांची होती. सेहवाग आणि आरती 17 वर्षे एकमेकांचे मित्र होते, त्यानंतर 2002 मध्ये सेहवागने मस्करीत आरतीला प्रपोज केले. एवढेच नाही तर आरतीने सेहवागच्या प्रस्तावाला लगेच हो म्हटले. त्यानंतर 2004 मध्ये सेहवाग आणि आरती यांनी एकमेकांशी लग्न केले. दोघांनाही दोन मुले आहेत. ज्यांची नावे आर्यवीर आणि वेदांत आहेत.
कोण आहे आरती अहलावत?
विरेंद्र सेहवागची पत्नी नेमकी कोण आहे
आरती अहलावत ही दिल्लीतील प्रसिद्ध वकील सूरज सिंह अहलावत यांची मुलगी आहे. तथापि, असे मानले जाते की सेहवागचे कुटुंब या लग्नासाठी तयार नव्हते. एका मुलाखतीदरम्यान सेहवागने असेही म्हटले होते की सुरुवातीला आमचे पालक या लग्नासाठी तयार नव्हते. कारण आमच्या कुटुंबात जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न होत नाही. कुटुंबाला पटवून देण्यास वेळ लागला आणि नंतर त्यांनी लग्न केले असेही त्याने या मुलाखतीदरम्यान सांगितले होते.
अरूण जेटलींनी लावले होते लग्न
माजी कायदा मंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी त्यांच्या घरी लग्न केले तेव्हा वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांच्या लग्नाने बरीच बातमी दिली. अरुण जेटली हे बराच काळ डीडीसीएशी जोडलेले होते आणि त्यांना भारतीय क्रिकेटमध्येही खूप रस होता. तसंच विरेंद्र सेहवाग यांच्याशी त्यांची जवळीक होती आणि त्यामुळे या दोघांच्या लग्नात अरूण जेटली यांचा मोठा हात असल्याचे सांगण्यात येते आणि एका मुलाखतीदरम्यान सेहवागनेदेखील हे मान्य केले होते
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
🚨Breaking News:Virender Sehwag And His Wife, Aarti Ahlawat Heading For A Divorce? pic.twitter.com/rp6pvFsegL
— Manu (@manu_dadhwal) January 22, 2025
गेल्या काही महिन्यांपासून वेगळे
गेल्या काही महिन्यांपासून दोघेही एकत्र नाहीत
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सेहवाग आणि आरती गेल्या अनेक महिन्यांपासून वेगळे राहत असल्याच्या चर्चा आहेत. गेल्या दिवाळीत सेहवागने त्याच्या मुलांसोबत आणि आईसोबतचे फोटो पोस्ट केले होते पण तिथे आरतीचा उल्लेख नव्हता. तर दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू सेहवागचा जन्म २० ऑक्टोबर १९७८ रोजी झाला आणि तो ४६ वर्षांचा आहे. तर बातमीनुसार, आरती अहलावतचा जन्म १६ डिसेंबर १९८० रोजी झाला. वीरू आणि आरतीच्या वयात दोन वर्षांचा फरक आहे.