फोटो सौजन्य - सोशल मीडिया
एम धोनी व्हिडीओ : भारताचा स्टार कर्णधार आणि खेळाडू एम धोनीचे चाहते जगभरामध्ये आहेत. परंतु तो सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत करतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सोशल मीडियावर त्याची नेहमीच क्रेझ असते. महेंद्रसिंह धोनी बरेच वर्ष झाले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण अजूनही तो देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार होता त्यानंतर मागील वर्षी त्याने कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे. पण तो आयपीएल २०२५ मध्ये सुद्धा त्याच्या चाहत्यांसाठी खेळताना दिसणार आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असलेल्या महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या पुढील हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. २०२० मध्ये क्रिकेटला अलविदा केल्यानंतर धोनी फक्त आयपीएलमध्ये खेळतो. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगच्या पुढील हंगामापूर्वी धोनीने माता राणीचे आशीर्वाद घेतले आहेत. धोनीने त्याच्याच शहर रांचीमधील देउरी गावातील माँ देउरी मंदिराला भेट दिली. असे म्हंटले जाते धोनी ज्या मंदिरामध्ये गेला होता ते मंदिर शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. धोनी आयपीएलच्या प्रत्येक हंगामापूर्वी किंवा कोणत्याही मोठ्या स्पर्धेपूर्वी या मंदिराला भेट देतो.
It’s a ritual for him to visit DEWRI MAA’S temple at the start of every cricketing season . Man of culture indeed ❤️🙏#MSDhoni #IPL2025 pic.twitter.com/r5BtTygmKh
— Chakri Dhoni (@ChakriDhonii) January 23, 2025
धोनी गुरुवारी मंदिरात पोहोचला होता आणि तिथले त्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये धोनी मंदिरात जाताना दिसत आहे. धोनी हिरव्या रंगाच्या टी-शर्टमध्ये मंदिराच्या पुजाऱ्यासोबत उभा आहे. धोनीने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषकापूर्वी या मंदिरालाही भेट दिली होती आणि त्यानंतर ट्रॉफी जिंकून परतला होता. २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीही त्याने या मंदिराला भेट दिली होती आणि ट्रॉफी जिंकून तो परतला होता. २०२३ मध्ये आयपीएल सुरू होण्यापूर्वी धोनीने या मंदिराला भेट दिली होती. यंदाही धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने विजेतेपद पटकावले.
धोनीला यंदाच्या आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. याच कारणामुळे चेन्नई सुपर किंग्जला त्याला करारबद्ध करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागले नाहीत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये धोनीची गणना केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाच वेळा आयपीएल जिंकले आहे. गेल्या वर्षी त्याने कर्णधारपदाचा राजीनामा देत युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे संघाची कमान सोपवली होती. अनेक प्रयत्न करूनही संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकला नाही.