उदगीर-पुणे बसने घेतला पेट
तरुणांचे धाडसी बचावकार्य
अर्ध्या तासाच्या थरारानंतर आगीवर नियंत्रण
३८ प्रवासी सुखरूप, एक महिला जखमी
हर्षल बागल, Satara News: वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले, आगीचे उंचच उंच लोळ आणि डिझेल टाकीत असलेल्या इंधनामुळे स्फोटाचा धोका... परिस्थिती अत्यंत भयावह होती. मात्र, मृत्यूचा धोका डोळ्यांसमोर असतानाही मदतीसाठी धावलेल्या तरुणांनी आणि कुर्डूवाडी अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीशी दोन हात केले. अक्षय तोमर, रामराज बागल, रविराज सलगर, प्रत्यक्ष दर्शी सौरभ बागल, सचिन परबत, टिपर चालक सलमान पटेल, गोपी बागल यांच्यासह अग्निशामक दलाच्या जवानांनी दाखवलेल्या धाडसाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. संकटाच्या काळात हे सर्वजण खऱ्या अर्थाने 'खतरो के खिलाडी' ठरले!
उदगीरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या उदगीर डेपो च्या बस क्रमांक MH 24 AU 8062 ला अचानक आग लागली. वाहक अमोल सामनगावे व चालक माधव गाडे होते. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. वाहनातील 38 प्रवाशांची धावपळ उडाली. या दुर्घटनेत पुण्याला जाणाऱ्या कौशल्या डोंगरे (वय ६६, रा. लातूर) या जखमी झाल्या. सर्वाना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
आगीचा भडका वाढत असताना वाहनाच्या डिझेल टाकीत इंधन असल्याने मोठ्या स्फोटाची भीती होती. अशा धोकादायक परिस्थितीतही अक्षय तोवर, रामराज बागल, रविराज सलगर, सौरभ बागल, सचिन परबत आणि सलमान पटेल यांनी मदतकार्यात पुढाकार घेतला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या धाडसाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
आगीचा भडका वाढत असताना वाहनाच्या डिझेल टाकीत इंधन असल्याने मोठ्या स्फोटाची भीती होती. अशा धोकादायक परिस्थितीतही अक्षय तोवर, रामराज बागल, रविराज सलगर, सौरभ बागल, सचिन परबत आणि सलमान पटेल यांनी मदतकार्यात पुढाकार घेतला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या धाडसाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
खराब झालेल्या बस... पत्रे निघालेल्या बस... खराब टायर... लाखो किलोमीटर ची वाहतूक... तरीही बसच्या वाढत्या फेऱ्या सर्विसिंग कडे दुर्लक्ष... अशा अनेक कारणांमुळे बसचे दर 30 किलोमीटर ला एक तरी अपघात किंवा घोटाळा दिसून येतोच सर्वसामान्यांची लाल परी म्हणून ओळखणाऱ्या बसची सुरक्षितता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
आग लागलेली एसटी बस कोणत्या मार्गावर धावत होती आणि तिचा क्रमांक काय होता?
आग लागलेली बस उदगीर डेपोची असून ती उदगीरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती; या बसचा क्रमांक MH 24 AU 8062 असा होता.
या दुर्घटनेत बसमधील प्रवाशांची स्थिती काय आहे?
स्थानिक तरुण आणि कुर्डूवाडी अग्निशामक दलाच्या जवानांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व ३८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले; मात्र या घटनेत पुण्याला निघालेल्या कौशल्या डोंगरे (वय ६६, रा. लातूर) या जखमी झाल्या आहेत.
डिझेल टाकीच्या स्फोटाचा धोका असताना कोणी मदतकार्यात पुढाकार घेतला?
अक्षय तोमर, रामराज बागल, रविराज सलगर, सौरभ बागल, सचिन परबत, टिपर चालक सलमान पटेल आणि गोपी बागल या तरुणांनी कुर्डूवाडी अग्निशामक दलाच्या जवानांसह जीवाची पर्वा न करता मदतकार्य राबवले.