Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Rain Alert: नागरिकांनो सावधान! उजनी धरणातून तब्बल 1 लाख क्यूसेक्सने विसर्ग; चिंता वाढली

नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, जनावरे व साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच सखल भागातील रहिवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 27, 2025 | 09:47 PM
Solapur Rain Alert: नागरिकांनो सावधान! उजनी धरणातून तब्बल 1 लाख क्यूसेक्सने विसर्ग; चिंता वाढली

Solapur Rain Alert: नागरिकांनो सावधान! उजनी धरणातून तब्बल 1 लाख क्यूसेक्सने विसर्ग; चिंता वाढली

Follow Us
Close
Follow Us:

इंदापूर:  उजनी धरणातून भीमा नदीपात्रात तब्बल १ लाख क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिस्थितीनुसार हा विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. स्थानिक पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत धरणातील एकूण साठा ३४२०.२० दशलक्ष घनमीटर (१२०.७७ टीएमसी) एवढा नोंदविण्यात आला आहे. यापैकी ५७.११ टीएमसी एवढा जिवंत साठा असून, धरणाची जिवंत साठा क्षमता तब्बल १०६.६० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. दौंड येथील नदी गेज स्टेशनवर पाणीपातळी ४९८.६८० मीटर एवढी असून, येथून धरणाकडे ८५१६ क्यूसेक्स इतकी आवक होत आहे.
सध्या उजनी धरणावरून सांडव्यावाटे ४०,००० क्यूसेक, वीजगृहातून १,६०० क्यूसेक, बोगद्यावाटे २०० क्यूसेक तसेच विविध योजनेतून मिळून एकूण ४२,००० हून अधिक क्यूसेक इतका विसर्ग सुरू आहे. मात्र, दुपारी तो थेट एक लाख क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे.

कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी जारी केलेल्या सूचनेत नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, जनावरे व साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच सखल भागातील रहिवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धरण परिसरासह बारामती, इंदापूर, दौंड, पंढरपूर या भागातील ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

पुढील काही तासांत पावसाचं ‘महावादळ’

रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात पुढील काही तासांत व् उद्यासाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

Maharashtra Rain Alert: पुढील काही तासांत पावसाचं ‘महावादळ’; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस नुसता धुवून काढणार

सचेतच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या पूर्व सूचना देण्यात येत असून भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यात सीना नदी वडकबाळ येथे इशारा पातळीच्यावर वाहत आहे. तर टाकळी येथे भीमा नदी इशारा पातळीच्यावर वाहत आहे. सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने स्थानिक पथके तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे.

Web Title: Ujani dam release 1 lakh cusec water in bhima river alert to solapur heavy rain maharashtra weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 09:47 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Solapur
  • Ujani Dam

संबंधित बातम्या

Solapur Crime: मुलीला मेसेज पाठवल्याचा राग, समेटाच्या बहाण्याने बोलावून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला; तरुण दोन दिवस बेशुद्ध
1

Solapur Crime: मुलीला मेसेज पाठवल्याचा राग, समेटाच्या बहाण्याने बोलावून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला; तरुण दोन दिवस बेशुद्ध

यशवंत माने हा मूर्ख माणूस, गांजा पितो अन्…; शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची जीभ घसरली
2

यशवंत माने हा मूर्ख माणूस, गांजा पितो अन्…; शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची जीभ घसरली

Solapur Crime: धक्कादायक! हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण; व्हिडिओ व्हायरल
3

Solapur Crime: धक्कादायक! हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Solapur Crime: तरुण वकिलाचा राहत्या घरी गळफास घेत टोकाचा निर्णय; चिठ्ठीत आईला ठरवलं जबाबदार
4

Solapur Crime: तरुण वकिलाचा राहत्या घरी गळफास घेत टोकाचा निर्णय; चिठ्ठीत आईला ठरवलं जबाबदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.