
भीमा खोऱ्यातून ५५ हजार क्युसेकचा विसर्ग! (Photo Credit- X)
सध्या मुळशी धरणातून १० हजार क्युसेक, पवना धरणातून ७ हजार ४५० क्युसेक, चासकमानमधून १५ हजार क्युसेक, घोड धरणातून १२ हजार क्युसेक, वीर धरणातून १३ हजार ९११ क्युसेक, भामा-आसखेडमधून ४ हजार ३९६ क्युसेक, वडिवळेमधून ४ हजार ७०४ क्युसेक आणि खडकवासला धरणातून २ हजार ९९६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या सर्व धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी भीमा नदीमार्गे उजनी धरणात येत असल्याने धरणातील आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
उजनी धरणाची पाणीपातळी सध्या ४९६.२०० मीटरवर पोहोचली असून, धरणातील एकूण पाणीसाठा १०९.९५ टीएमसी इतका झाला आहे. तर उपयुक्त (जिवंत) पाणीसाठा ४६.३० टीएमसी असून, उपयुक्त साठ्याची टक्केवारी ८६.४२ टक्क्यांवर पोहोचली आहे. दौंड नदी मापन केंद्रावर ५०१.१०० मीटर पाणीपातळीची नोंद झाली असून, उजनी धरणात तब्बल ५५ हजार ३१९ क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. ही आवक कायम राहिल्यास उजनीचा जलसाठा आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
Maharashtra Rain Alert: राज्यात नुसता धुमाकूळ; तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर…, घाट माथ्यावर मुसळधार
सीना-माढा उपसा सिंचन योजना : २८० क्युसेक
दहीगाव उपसा सिंचन योजना : ९० क्युसेक
भीमा-सीना बोगदा : ९०० क्युसेक
मुख्य कालवा : २ हजार क्युसेक
भीमा खोऱ्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास वरच्या धरणांमधील विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीस्थितीवर जलसंपदा विभागाचे बारकाईने लक्ष असून, नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
डिंभे धरण 82 टक्के भरले; घोडनदीपात्रात कोणत्याही क्षणी विसर्गाची शक्यता