सांगली – सध्या राज्यात धो..धो पाऊस बरसत आहे. राज्यातील काही भागात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस (State Rain) पडत आहे. चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर (Chiplun, Mahad, Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Mumbai, Thane, Palghar) या जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, अमरावती जिल्ह्यांसह अनेक भागांत मुसळधार पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी येथे बुधवारी दरड कोसळली. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. आजही या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाकडून (IMD) रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र या मुसळधार पावसामुळं विविध ठिकाणी मोठी जीवितहानी झाली आहे. सांगलीतून (Sangli News) एक दुर्घटना समोर येत आहे. (unfortunate death of two farmers in atpadi in sangli farmers died due to electric shock)
दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये (Atpadi) दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक (Electric Shock) लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आटपाडी तलावात पाणी पातळी कमी झाल्याने पाण्यातील विद्युत मोटर पाण्यात ठेवण्यासाठी हे दोघे जण गेले असताना त्यांना विजेचा शॉक बसला, यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पावसाच्या पाण्यामुळं यांचे जीव गेले अशी लोकाची भावना आहे.
घटना कशी घडली?
गुरुवारी दुपारी अनिकेत आणि त्याच्या मावशीचे पती विलास दोघेही तलावाकडे गेले होते. तलावातील पाणी कमी झाल्याने पंप बाहेर आल्याचे दिसले. आटपाडी तलावातून 12 किलोमीटरची पाईपलाईन करुन पाणी नेले आहे. तराफ्याद्वारे विद्युतपंप पाण्यात सोडला आहे. तलावातील पंप बाहेर आल्यानं तो आणखी खाली सोडण्यासाठी दोघेही पाण्यात उतरले. यावेळी वायर शॉर्ट होऊन वीजप्रवाह पाण्यात उतरला होता. त्यामुळ शॉक लागल्यानं मृत्यू झाला. अनिकेत अमृत विभुते (वय 24 वर्षे रा. माडगुळे ता.आटपाडी) आणि विलास मारुती गूळदगड (वय 45 वर्षे रा.शेवते ता.पंढरपूर जि.सोलापूर ) अशी मृत शेतकऱ्यांची नावं आहेत. गुरुवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. या दुर्देवी घटनेमुळे आटपाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.