Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Unseasonal Rain: कराड तालुक्याला अवकाळीचा तडाखा! गहू, ज्वारी अन् भाजीपाला पिकाला फटका

तालुक्यातील काले, उंडाळे, येळगाव, वाठार रेटरे बुद्रुक परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. उंडाळे भागासह नांदगाव, कालवडे, कासारशिरंबे, बेलवडे बुद्रुक व वाठार परिसरात गारांचा वर्षाव झाला.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 20, 2026 | 01:32 PM
अतिवृष्टीने कराडच्या खरीपाला ब्रेक; 31 हजार हेक्टरपैकी केवळ 24.60 टक्के पेरणी

अतिवृष्टीने कराडच्या खरीपाला ब्रेक; 31 हजार हेक्टरपैकी केवळ 24.60 टक्के पेरणी

Follow Us
Follow Us:
  • कराड शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी
  • गारपिटीमुळे गहू, ज्वारी आणि भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान
  • हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे सेवा रस्त्यावरील सखल भागात कंबरे इतके पाणी
Unseasonal Rain:  कराड शहरासह तालुक्यात गुरुवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे नागरिकांसह शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. गुरुवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास १० ते १५ मिनिटे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. सकाळपासूनच वातावरण ढगाळ असल्याने पावसाची चिन्हे दिसत होती; मात्र अचानक आलेल्या सरींनी सणाच्या गडबडीत व्यत्यय आणला. पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला.

दरम्यान, गुरुवारी कराडचा आठवडी बाजार असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होती. गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी आलेले नागरिक आणि भाजी विक्रेते अचानक आलेल्या पावसामुळे गोंधळून गेले. अनेकांनी माल झाकण्यासाठी धावाधाव केली, तर काहींना आसरा शोधावा लागला. ग्रामीण भागातही या पावसाचा फटका बसला. सध्या शेतकऱ्यांची शाळू व गहू काढणी सुरू असून, काही ठिकाणी वाळवण, कडबा बांधणी व गंजी लावण्याचे काम सुरू आहे. अशा वेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

Mumbai Press Club: मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी, एका ईमेलमुळे मोठी खळबळ

तालुक्यातील काले, उंडाळे, येळगाव, वाठार रेटरे बुद्रुक परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. उंडाळे भागासह नांदगाव, कालवडे, कासारशिरंबे, बेलवडे बुद्रुक व वाठार परिसरात गारांचा वर्षाव झाला. या गारपिटीमुळे गहू, ज्वारी आणि भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाचा पुणे-सातारा महामार्गाला फटका; हरिश्चंद्री येथे वाहतूक विस्कळीत

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले असून, याचा मोठा फटका पुणे-सातारा महामार्गाला बसला आहे. हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे सेवा रस्त्यावरील सखल भागात कंबरे इतके पाणी साचले होते. येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आणि मुख्य महामार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला.

Maharashtra Rain Alert: अबब! आज घरातच थांबा; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस धुवून काढणार, अलर्ट काय?

प्रवाशांचे हाल आणि वाहतूक कोंडी

सुमारे तासभर चाललेल्या या पावसामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागली, तर अनेक प्रवासी या कोंडीत अडकून पडले. पाऊस थांबल्यानंतर आणि पाण्याचा निचरा झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. मात्र, अचानक आलेल्या या संकटामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

 

 

 

Web Title: Unseasonal rain and hailstorm lash karad weekly market disrupted and crops damaged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Karad news
  • Maharashtra Weather

संबंधित बातम्या

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
1

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.