Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhule Rain: राज्यात अवकाळीचा धुमाकूळ; साक्रीत अनेक घरांची पडझड अन्…

गेले काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने शेतीचे, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 14, 2025 | 06:31 PM
Dhule Rain: राज्यात अवकाळीचा धुमाकूळ; साक्रीत अनेक घरांची पडझड अन्…
Follow Us
Close
Follow Us:

धुळे: गेले काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने शेतीचे, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आज धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे.

साक्री तालुक्यात मोठे नुकसान

साक्री तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू असून, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, गरीब कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. मोहने गुंजाळ गावात एका वयोवृद्ध महिलेच्या घराची पडझड झाल्याने तिची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मोहने गुंजाळ येथील सुरीबाई साधू अहिरे (वय अंदाजे 70) या शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या. दरम्यान, जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने त्यांच्या गरीब घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे.

मोहने ग्रामपचायतीचे सरपंच जितू गावित यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या गरीब महिलेच्या नुकसानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि प्रशासनाला तातडीने मदत पुरवण्याची मागणी केली आहे. सरपंच गावित यांनी यावेळी सांगितले की, अवकाळी पावसाने गरीब लोकांचे मोठे नुकसान केले आहे. सुरीबाईं सारख्या निराधार महिलांचे घर कोसळल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

– जितू गावित, सरपंच

दरम्यान, तलाठ्यांनी गावात येऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे. या वेळी सरपंच आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. मोहने गुंजाळ हे 500 लोकवस्तीचे छोटे गाव असून, येथील अनेक कुटुंबांना या नैसर्गिक संकटाचा फटका बसला आहे. आता प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा ग्रामस्थांना आहे.

अवकाळीने कोल्हापूरला झोडपले

हातकणंगलेसह परिसराला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वळवाच्या पावसाने अक्षर झोडपून काढले. आकाशात ढगांचा गडगडात आणि कडाडणाऱ्या विजेसह पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजाला चांगला दिलासा मिळाला आहे. दरम्यान अचानक पणे सुरू झालेल्या पावसामुळे बाजारपेठेत व्यापारी आणि ग्राहकांची एकच तारांबळ उडाली.

Kolhapur Rain: अवकाळीने कोल्हापूरला झोडपले; बाजारपेठेत व्यापारी आणि ग्राहकांची उडाली तारांबळ
सामानांची बांधाबाध करताना व्यापारी वर्गाची त्रेधा उडाली होती. हातकणंगलेचा बाजाराचा दिवस शहरवासीयांसह परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील कामगार खरेदीसाठी बाजारात आले होते. अचानकपणे धुवाधार पाऊस सुरू झाल्यामुळे एकच धावपळ उडाली, मिळेल त्या ठिकाणी व्यापाऱ्यांसह ग्राहकानी आश्रय घेतला. अशीच परिस्थिती, इचलकरंजी, कुंभोज, कोरोची, आळते, पेठ वडगाव  येथे पहावयास मिळाली. सुमारे तासभर धुवाधार सुरू असलेल्या पावसामुळे बघेल तिकडे पाणीच पाणी दिसत होते. सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती.

Web Title: Unseasonal rain damage in sakri taluka and dhule and all over maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 06:22 PM

Topics:  

  • dhule news
  • maharashtra rain news
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला
1

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत
2

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत

स्वातंत्र्यदिनी ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; घटनेने नागरिकांमध्ये संताप, आरोपीचे हॉटेल फोडले
3

स्वातंत्र्यदिनी ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; घटनेने नागरिकांमध्ये संताप, आरोपीचे हॉटेल फोडले

वसतिगृहात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
4

वसतिगृहात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.