दरवर्षीप्रमाणे ते या परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आले होते. घटनेची माहिती मिळताच कोंडवे वाघाचे पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी…
Kolhapur News : हवामान खात्याचे जुने अंदाज फेटाळून लावत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार चाहूल लागली असून, येत्या ३-४ दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाळी सुरुवातीनंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात वाढ होत गेली. १२ एप्रिलपर्यंत कमाल तापमान ३७ अंश सेल्सियस होते, त्यानंतर ते ३९ ते ४० अंशांदरम्यान स्थिरावले.
धारूर शिवारात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आमदार कैलास पाटील यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे.
धाराशिव तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Maharashtra News: जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण १,४५,६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून २,३३,८९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे २४३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून सुमारे ६०० शेतकरी प्रभावित झाले आहेत. नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
अहिल्यानगरमध्ये झालेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांची दुर्दशा झाली आहे. याच गोष्टीची गंभीर दखल घेत पालकमंत्री विखे पाटलांनी 100 टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहे.
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून सुमारे 28 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.
मागच्या चार दिवसांपासून पुण्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी गारांसह पाऊस कोसळल्यानंतर आज पुण्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.
अवकाळी पावसामुळे ५५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ३० हजारांहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. पावसामुळे हाताशी आलेली पिके मातीमोल झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू असून आहे. मजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकरी जास्त मजुरी देऊन कामे करून घेत आहेत. अशातच वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले.
अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे पर्यटकांच्या हालचालींवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामानातील या अनपेक्षित बदलामुळे पुढील काही दिवसांतही पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
हवामान विभागाने २३ ते २६ मार्च दरम्यान उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळांचा इशारा दिला आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ताशी ४० किलोमीटर वेगाचे वारे वाहू शकतात.
मनमाड परिसरात दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होत असल्याने काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी पहाटेपासून गहू काढणीच्या कामाला लागले असून, पावसाचे संकट उभे राहिले आहे.
रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस व गारपीट झाली.