पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज देखील रजयच्या विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. तर अवकाळी पावसामुळे शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
नांदेडमध्ये जोरदार पाऊस
नांदेड जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि गडगडाट होऊन अवकाळी पाऊस नांदेड शहरात कोसळत होता. काल रात्री नांदेड शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सखल भागात पाणी साचलेले दिसून आले.
नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस
राज्यात यावर्षी अवकाळी पावसाचा कालावधी अधिक लांबला असून, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या शेती आणि फळबागांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. यासोबतच नंदुरबार शहरातील काही परिसरांत शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने अनेक घरांचे नुकसान केले. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री व नंदुरबारचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज दुर्घटनाग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोकणात देखील पावसाची हजेरी
आज सकाळपासूनच चिपळूण, रत्नागिरी जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. चिपळूण शहरात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र पाऊस थोड्या वेळातच गेल्याने उष्णतेत वाढ झाली आहे.
Pune Rain News: पुण्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग; नागरिकांची उडाली तारांबळ
पालकमंत्री ॲड. कोकाटे ,राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून यंदा मौसमी पावसाचे आगमन वेळेपुर्वी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक शेतीच्या कामांची आखणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे,” असे आश्वासनही पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी दिले.
पुण्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग
गेले काही दिवस राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. पुणे शहरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासूनच पुणे शहरात आणि उपनगरात ढगाळ वातावरण झाले होते. दरम्यान दुपारच्या वेळेस पुण्यात पाऊस पडला.
‘या’ जिल्ह्यांना जोरदार पावसासह गारपीटीचा इशारा
मुंबईमधील तापमानामध्ये वाढ होत आहे. तर तापमानात वाढ होत असतानाच मुंबईत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने अंदाज दिला आहे. राज्यात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. विदर्भात तर तापमान ४२ अंशाच्या वर गेले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. भंडार आणि गोंदिया जिल्ह्यांना २८ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान ४४ अंशाच्या यावर पोहोचले आहे.