पुण्यात जोरदार पाऊस (फोटो- ट्विटर/सोशल मिडिया)
पुणे: गेले काही दिवस राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. पुणे शहरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच पुणे शहरात आणि उपनगरात ढगाळ वातावरण झाले होते. दरम्यान दुपारच्या वेळेस पुण्यात पाऊस पडला.
पुणे शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची त्रेधातिरपीट उडल्याचे दिसून आले. पुण्याच्या मध्यवर्ती भागात जोरदार पाऊस झाला. डेक्कन, कर्वेनगर, शिवाजीनगर आणि पेठ भागात पाऊस कोसळला.
गुरुवारी पावसाने थोडीशी उसंत घेतल्याचे दिसून आले. मात्र आज सकाळपासून वातावरण पावसाळी झाले होते. पिंपरी चिंचवडमध्ये देखील पावसानेहजेरी लावली. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसाने वाहतुकीवर देखील थोडासा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
पुण्याला अवकाळीने झोडपले
शुक्रवारी दुपारनंतर पुण्यात अवकाळी पावसाने जाेरदार हजेरी लावली. शहराचे दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा ४ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. वारे वाहत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेल्या २ दिवसांपासून शहरात पश्चिमी विक्षोभाचा परिणाम दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी शहराच्या दक्षिण भागात पाऊस सुरु झाला.
ग्रामीण भागात अधूनमधून पाऊस पडत होता. शुक्रवारी शहराचे कमाल तापमान ३२.०८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच, किमान तापमान २१.०७ अंश सेल्सिअस होते. भारतीय हवामान खात्याच्या शिवाजी नगर कार्यालयाने ही माहिती दिली आहे. पुढील पाच दिवस पुणे शहराचे हवामान ढगाळ राहुन दुपारनंतर ताशी तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहुन मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला अाहे. त्यामुळे पुणेकरांनी पुढील पाच दिवस छत्री, रेनकाेट घेऊनच बाहेर पडण्याची गरज आहे.
Pune Rain: पुण्याला अवकाळीने झोडपले; नागरिकांची तारांबळ, 5 दिवस कसे असणार वातावरण?
‘या’ जिल्ह्यांना जोरदार पावसासह गारपीटीचा इशारा
मुंबईमधील तापमानामध्ये वाढ होत आहे. तर तापमानात वाढ होत असतानाच मुंबईत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने अंदाज दिला आहे. राज्यात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. विदर्भात तर तापमान ४२ अंशाच्या वर गेले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. भंडार आणि गोंदिया जिल्ह्यांना २८ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान ४४ अंशाच्या यावर पोहोचले आहे.