Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai Unseasonal Rain: शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला! अवकाळी पावसाने वाईतील पिकांचे मोठे नुकसान

महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटनस्थळांवर सध्या पर्यटकांची गर्दी आहे. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे पर्यटकांचीही मोठी तारांबळ उडाली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 28, 2026 | 12:02 PM
Wai Unseasonal Rain 2026, Satara Crop Damage, Wheat Harvest Loss, Jowar Crop

Wai Unseasonal Rain 2026, Satara Crop Damage, Wheat Harvest Loss, Jowar Crop

Follow Us
Close
Follow Us:
  • 26 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी
  • अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी यांसारख्या पिकांच्या काढणीवर परिणाम
  • काढणीच्या हंगामातच अवकाळी पावसाने धडक दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
Wai Unseasonal Rain: तालुक्याच्या पश्चिम भागात 26 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावत जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना झाली. या अनपेक्षित हवामान बदलामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी यांसारख्या पिकांच्या काढणीवर परिणाम झाला. अनेक शेतकऱ्यांनी गहू काढणीस सुरुवात केली होती, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे कापलेले गहू भिजून गेले. तसेच ज्वारी काढणीची कामेही विस्कळीत झाली. शेतात साठवून ठेवलेला कडबाही पावसामुळे ओला झाला आहे. संध्याकाळी अचानक सुरू झालेल्या सुसाट वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Maharashtra IAS Transfers: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ८ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; काय आहे अशोक खरात कनेक्शन?

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात गव्हाचे ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. यंदा काढणीच्या हंगामातच अवकाळी पावसाने धडक दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गहू ज्वारी कडबा पिके आडवी झाली असून गुणवत्ता कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे.

महाबळेश्वरलाही अवकाळी पावसाने झोडपलं

महाबळेश्वर/मेढा: मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असतानाच महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यात निसर्गाचा कोप पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या प्रचंड गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे अनेक भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

दिल्ली मेट्रोत पुन्हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’! सीटवरुन महिला आणि सरदारजी भिडले; पाहा काय घडलं?

सायंकाळी अचानक बदलले हवामान

गेल्या दोन दिवसांपासून दिवसा कडाक्याचे ऊन पडत असतानाच, सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात मोठा बदल होत आहे. महाबळेश्वरसह जावळी तालुक्यातील कुडाळ, मेढा, करहर, पाचगणी, रुईघर, म्हसवे, सरताळे, सर्जापूर, बेलावडे, सोनगाव आणि आलेवाडी या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले.

वादळी वाऱ्याचा तडाखा; घरांचे नुकसान

पावसासोबतच सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने काही गावांमध्ये घरांच्या पत्र्यांना मोठा फटका बसला आहे. जोराच्या वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सुदैवाने, या नैसर्गिक आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे, मात्र शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

 

 

 

Web Title: Unseasonal rain ravages wai wheat and jowar crops destroyed in western region

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Agricultural News
  • Maharashtra Weather Forecast
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

Mahabaleshwar ची थंडी उडाली दूर! अवकाळी पावसामुळे पर्यटकांची तारांबळ; वादळी वारे अन्…
1

Mahabaleshwar ची थंडी उडाली दूर! अवकाळी पावसामुळे पर्यटकांची तारांबळ; वादळी वारे अन्…

IMD Weather : होळीनंतर हवामान फिरलं! दिल्लीत थंडीचा कडाका तर उत्तर प्रदेशात पावसाचं सावट; काय सांगतोय अंदाज!
2

IMD Weather : होळीनंतर हवामान फिरलं! दिल्लीत थंडीचा कडाका तर उत्तर प्रदेशात पावसाचं सावट; काय सांगतोय अंदाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.