यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन निघाले नसल्याच्या तक्रारी झाल्यानंतर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली होती.. त्यामध्ये गणेशा सोयाबीन वाणाचे ५ नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत.
पावसाने उघडीप दिल्याने जमिनीला वाफसा येत असल्याने शेतकऱ्यांकडून पेरण्यांना सुरुवात केली आहे. त्याचबरोबर पेरणीच्या अगोदर मशागतीही काही ठिकाणी सुरू असल्याने कुळवणीसाठी लगबग सुरू आहे.
मावळ तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हा पाऊस शेतकऱ्यांच्या शेतीसाठी महत्वाचा असला तरी दुसरीकडे उन्हाळी बाजरीचे पिके या पावसाने हिरावून नेली आहेत.
शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, आवश्यकता भासल्यास पुरवणी मागण्यांमध्ये वाढीव निधीची तरतूद करण्यात येईल.