सोलापूर – बार्शी तालुक्यातील आगळगाव झालेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेले वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची पुरती धांदल उडाल्याचे चित्र पहायला मिळालं. मांडेगावातील शेतकरी प्रभाकर मिरगणे यांची दीड एकर परिसरातील द्राक्षबाग पूर्णपणे भुईसपाट झाली आहे.
बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे झालेल्या अवकाळी पावसाचा जोरदार फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे आगळगाव अनेक शेतकऱ्यांच नुकसान झाल्याची माहिती आहे. शेतकरी प्रभाकर मिरगणे यांनी त्यांच्या शेतात द्राक्षांचा लागवड केली होता. या द्राक्षबागेची विक्री करण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याने येऊन पाहणी केली होती तर 60 रुपये दराने द्राक्षाची मागणी ही केली होती. मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे या शेतकऱ्याला लाखोंचा फटका बसला आहे.
[read_also content=”भारनियमनामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर, वीज उपकेंद्रात केली तोडफोड https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/heavy-regulation-angers-farmer%e0%a5%87-sabotages-power-substation-in-bhandara-nrps-269128.html”]
[read_also content=”विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या, दोन दिवसापासून होती घरातून बेपत्ता, अनेक शंकांना आलय उधाण https://www.navarashtra.com/maharashtra/student-commits-suicide-by-strangulation-has-been-missing-from-home-for-two-days-many-suspected-nraa-269187.html”]