लसणाच्या नावाखाली विकल्या जातात आहेत सिमेंटच्या पाकळ्या (फोटो सौजन्य - pinterest)
जेवणात लसूण तर पाहिजेच असतो. लसणाची फोडणी दिल्याशिवाय जेवणाला चव येत नाही. पण तुम्ही चवीसाठी आणि फोडणीसाठी वापरत असलेली लसूण असली आहे का नकली? एका भाजीवाल्याने चक्क सिमेंटपासून तयार केलेली लसूण विकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लसणीचा आकार, रंग, रूप अगदी इतर लसणींप्रमाणेच आहे, पण त्या पाकळांच्या आतमध्ये आपल्याला केवळ सिमेंट पाहायला मिळेल.
हेदेखील वाचा- मुंबई विमानतळावरील प्रवाशाच्या बॅगेत आढळलं धोकादायक रसायन; ग्राउंड स्टाफच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला
व्हिडीओमध्ये पाहयला मिळत आहे की, लसणीचा रंग इतर लसणींप्रमाणे पांढरा आहे. पण ही ह्या लसणीच्या आतमध्ये केवळ आणि केवळ सिमेंट पाहायला मिळालं. ह्या विचित्र घटनेवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर अशा बोगस विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील अनेकांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यामध्ये बाजोरिया नगर परिसरात सुधाकर पाटील आणि त्यांच्या पत्नि राहतात. सुधाकर पाटील पोलीस विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी त्यांच्या घरासमोर असलेल्या एका फेरीवाल्याडून लसूण विकत घेतली. लसूण दिसायला इतर लसणांप्रमाणेच होती. लसूण खरेदी केल्यानंतर सुधाकर पाटील घरी आले आणि त्यांनी लसणीच्या पाकळ्या वेगळ्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या पाकळ्या लसणीपासून वेगळ्या होत नव्हत्या. त्यामुळे सुधाकर पाटील यांनी चाकूच्या साहाय्याने ती लसूण कापली, तेव्हा त्या लसणीच्या आत सिमेंट पाहायला मिळालं. आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करून ह्या लसणीच्या पाकळ्या तयार करण्यात आल्याचं समोर आलं.
हेदेखील वाचा- न्यायालयात युक्तिवाद सुरू असतानाच वकिलाचा हार्ट अटॅकने मृत्यू; नागपुरातील घटना
आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करून सिमेंटच्या लसूण तयार केल्या जातात. ह्या लसणीच्या पाकळ्या एकमेकांपासून वेगळ्या होत नाहीत. या लसणांवर पांढरा रंग दिला जातो, जेणेकरून ह्या लसणी हूबेहूब इतर लसणांप्रमाणेच दिसतील. या लसणाच्या गाठीचे वजन १०० ग्रॅम इतकं असतं. काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांकडून अशा फसणूकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. सध्या अनेक शहरांमध्ये लसणांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे काळाबाजार करणारे विक्रेते या गोष्टींचा फायदा घेऊन नागरिकांची फसवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही वस्तू खरेदी करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अन्नामध्ये भेसळीचे प्रमाण वाढले आहे. कधी मीठ आणि साखरेत प्लास्टिकचे तुकडे आढळतात. तर कधी तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदुळ मिसळला जातो. या सर्व घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या जिवासोबत खेळ सुरु आहे. अशा बोगस विक्रेत्यांमुळे सामान्य नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. अशा बोगस विक्रेत्यांवर कारवाई करून या सर्व घटनांना आळा घालावा अशी मागणी आता केली जात आहे. यासोबतच कोणतीही वस्तू खरेदी करताना सामान्य नागरिकांनी सतर्क राहणं तितकेच गरजेचं आहे.