न्यायालयात युक्तिवाद सुरू असतानाच वकिलाचा हार्ट अटॅकने मृत्यू (फोटो सौजन्य- pinterest)
हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. वृध्द व्यक्तिंसोबतच तरूणांमध्ये देखील हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊननंतर या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायल मिळत आहे. नागपुर शहरातून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर शहरात चक्क न्यायालयात युक्तिवाद सुरु असताना एका वकिलाला हार्ट अटॅक आला, आणि या घटनेत संबंधित वकिलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वकील तलत इक्बाल कुरैशी असं हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेल्या वकिलाचं नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेदेखील वाचा- डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्यसेवा कोलमडली; अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
शनिवारी 17 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमरास ही घटना घडली. नागपूर न्यायालयात शनिवारी एका खटल्याची सुनावणी सुरु होती. यावेळी वकील तलत इक्बाल कुरेशी युक्तिवाद करत होते. मात्र अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना हृदयविकाराच्या झटका आला. त्यानंतर न्यायाधीश एसबी पवार यांनी त्यांच्या वैयक्तिक गाडीतून वकील तलत इक्बाल कुरेशी यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालत दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्ति केली जात आहे. तर न्यायालयात कोणत्याही वैद्यकीय सुविधा का देण्यात येत नाही, यासाठी अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वकील तलत इक्बाल कुरेशी शनिवारी सकाळी जिल्हा न्यायालयात पोहोचले. सातव्या मजल्यावर असलेल्या वरिष्ठ विभागीय दिवाणी न्यायाधीश एस.बी.पवार यांच्या न्यायालयात त्यांचा युक्तिवाद सुरु झाला. आपली प्राथमिक उलटतपासणी पूर्ण केल्यानंतर कुरेशी यांनी कोर्टाला दाखले देण्याची माहिती दिली आणि ते जागेवर जाऊन बसले. विरोधी पक्षाचे वकील आपली बाजू मांडत असताना कुरेशी जागेवरून खाली पडले. यावेळी त्यांना बेशुद्धावस्थेत पाहून न्यायाधीश पवार यांनी तात्काळ त्यांच्या जागेवरून खाली उतरून वेळ न दवडता वकील तलत इक्बाल कुरेशी यांना त्यांच्या गाडीत बसवून जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी वकील तलत इक्बाल कुरेशी यांना मृत घोषित केले.
हेदेखील वाचा- नाशिकमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलीस अॅक्शन मोडवर; 15 हल्लेखोर ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, वकील तलत इक्बाल कुरेशी घरी एकटेच राहत होते. कुरेशी यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सागितलं जात आहे. तेव्हापासून ते एकटेच राहत होते. दोन्ही मुली विवाहित आहेत. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. तर न्यायालयात कोणत्याही वैद्यकीय सुविधा का देण्यात येत नाही, यासाठी अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
या घटनेबाबत डीबीएचे माजी अध्यक्ष कमल सतुजा यांनी सांगितलं की, जिल्हा न्यायालय संकुलात दररोज 8 हजार वकील कामासाठी येतात. न्यायालयीन कर्मचाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. कोर्टात दररोज 30 ते 40 हजार लोक त्यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी येतात. अशा स्थितीत न्यायालयात रुग्णवाहिका व प्रथमोपचाराची सुविधा असण आवश्यक आहे.