Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विक्रांतचे सोयाबीन बियाणे ठरताहेत शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ! पवनार येथील कास्तकारांची जिल्हा प्रशासन व कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार

जिल्हा प्रशासनाकडून व कृषी विभागाकडून बोगस बियाणे विरोधात एक पथकही तयार करण्यात आले असून, बोगस कंपन्याविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. परिणामी शेतकऱ्याची विक्रांत सोयाबीनमुळे फसगत झाल्याने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Jun 26, 2022 | 03:37 PM
Vikrant's soybean seeds are a headache for farmers! Complaint of tax collectors at Pawanar to district administration and agriculture officer

Vikrant's soybean seeds are a headache for farmers! Complaint of tax collectors at Pawanar to district administration and agriculture officer

Follow Us
Close
Follow Us:

पवनार : पावसाच्या सरींचे आगमन होताच बळीराजा पेरणीला सज्ज झाला. पावसामुळे लावणी सहित पेरण्याही खोळंबल्या होत्या. मात्र, १८ जूनला काही भागात पावसाने हजेरी लावल्याने पवनार येथील शेतक-यांनी १९ जूनला सोयाबीनची पेरणी केली. मात्र, आठवडा होऊनही विक्रांत कंपनीचे सोयाबीन (Vikrants soybean seeds)  बियाणे उगवले नसल्याची तक्रार पवनार(Pavnar) येथील कास्तकारांनी जिल्हा प्रशासन (District Administration) व कृषी अधिकाऱ्यांकडे (Agriculture Officer ) केली आहे. त्यामुळे, विक्रांत कंपनीचे सोयाबीन बियाणे शेतक-यांसाठी डोकेदुखी (Headache for farmers) ठरत आहे.

यापूर्वी देवळी तालुक्यातील शेतक-यांनी सदर कंपनीचे बियाणे उगवले नसल्याची तक्रार केली होती. आता पवनार येथील मारोती धोंगडे यांनी पाच एकरात सहा बॅग विक्रांत सोयाबीनची पेरणी केली. तसेच, रवी आंबटकर यांनी आठ बॅग तर संदीप कारामोरे यांनी पाच बॅग पेरले. तर, गुड्डू माणिक देवतळे यांनीही पेरणी केली. मात्र, एकाही ठिकाणी विक्रांत सोयाबीन उगवले नसल्याने शेतकऱ्यांची मोठी फसगत झाली आहे. यामुळे, पवनार येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, पंचायत समिती, कृषी विभाग तसेच अक्षय सिडस दुकानदार वर्धा, यांना लेखी तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून व कृषी विभागाकडून  बोगस बियाणे विरोधात एक पथकही तयार करण्यात आले असून, बोगस कंपन्याविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. परिणामी शेतकऱ्याची विक्रांत सोयाबीनमुळे फसगत झाल्याने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

यामुळे शासन बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपन्याविरोधात कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार का ? असा संतप्त प्रश्न बळीराजाकडून उपस्थित होत आहे. आधीच निसर्गराजाने  बळीराजाकडे पाठ फिरवली. मागील वर्षीही अतिवृष्टीमुळे तर काही ठिकाणी करप्या रोगाने आक्रमण केले होते. यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट निर्माण झाली. सातत्याने शेती क्षेत्रात घट निर्माण होऊ लागल्याने शेती करणेही दुरापास्त होऊ लागले आहे. त्यातच बियाण्यांसह खते किटनाशके यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेती करणे कठीण झाले. त्यातच बोगस बियाणे निघत असल्याने बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. बोगस कंपन्या विरोधात कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची हिम्मत दाखवणार का ? कृषी विभाग व जिल्हा प्रशासन कंपन्यांवर कठोर कारवाई खरच करतील की, केवळ आश्वासन देवून हवेतच विरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Vikrants soybean seeds are a headache for farmers complaint of tax collectors at pawanar to district administration and agriculture officer nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2022 | 03:36 PM

Topics:  

  • district administration
  • wardha News

संबंधित बातम्या

कारागिरानेच लावला सराफा व्यावसायिकांना चुना; तब्बल 129 ग्रॅम सोने घेऊन झाला पसार
1

कारागिरानेच लावला सराफा व्यावसायिकांना चुना; तब्बल 129 ग्रॅम सोने घेऊन झाला पसार

‘आमच्याविरोधातील केस मागे घे, नाहीतर तुला…’; महिलेसह तिच्या मुलाला दिली जीवे मारण्याची धमकी
2

‘आमच्याविरोधातील केस मागे घे, नाहीतर तुला…’; महिलेसह तिच्या मुलाला दिली जीवे मारण्याची धमकी

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था
3

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी दाखल
4

Wardha : गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.