Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wadgaon Maval News: वडगाव मावळ नगराध्यक्षपदाच्या नव्या आरक्षण सोडतीकडे लक्ष

नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून निवडून द्यावयाचे असल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आपापल्या पक्षातील इतर नगरसेवक पदाच्या उमेदवारांची कमान सांभाळावी लागणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 05, 2025 | 04:07 PM
Wadgaon Maval News: वडगाव मावळ नगराध्यक्षपदाच्या नव्या आरक्षण सोडतीकडे लक्ष
Follow Us
Close
Follow Us:

सतीश गाडे 

 वडगाव मावळ:  तीन चार वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडतीची तारीख 6 ऑक्टोबर तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. कोणत्या संवर्गासाठी आरक्षित होते यामुळे हौशे, नवशे इच्छुक उमेदवार धास्तावले असून आपल्यासाठीच आरक्षण निघावे यासाठी देव पाण्यात बुडवले असल्याची चर्चा सुरू आहे.

मागील महिन्यांपूर्वी वडगाव मावळ नगरपंचायच्या एकूण १७ प्रभाग रचना झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भाजपा, शिवसेना शिंदे गट अन्य पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची गर्दीही झाली. इच्छुक व पक्षाकडून उमेदवारी मिळणार्‍या अनेकांनी आपल्या प्रभागात जनसंपर्कही सुरू केला. नुकत्याच झालेल्या नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमानिमित्त संभाव्य उमेदवारांचे मोठमोठे पोस्टर व बॅनरही शहरात झळकत आहे. प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीसुद्धा केली आहे. कोेणत्या पक्षाकडून कोण उभा राहणार? याबाबतची चर्चाही शहरात रंगत आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.

Shirdi: राज्यातील बड्या नेत्यांची शिर्डीत खलबते; अमित शहांसोबत ४५ मिनिटांच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून निवडून द्यावयाचे असल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आपापल्या पक्षातील इतर नगरसेवक पदाच्या उमेदवारांची कमान सांभाळावी लागणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार देण्यावर प्रमुख राजकीय पक्षाचा भर राहणार आहे.वडगाव मावळ नगरपंचातीची होणारी ही निवडणूक चार पाच वर्षानी होत असल्याने या निवडणुकीचे इतिहासाच्या दृष्टीने विशेष महत्त्व राहणार आहे.

महिला सर्वसाधारण आरक्षण लागल्यास इच्छुक

नगराध्यक्ष पदासाठी जर सर्वसाधारण महिला आरक्षण लागले, तर अनेक इच्छुक महिला नेत्यांनी आपले दावे आधीच मजबूत केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अनेक इच्छुक महिला रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा हाहा:कार ; अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती, ४७ जणांचा मृत्यू 

मात्र महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहर भारतीय जनता पक्षाने “वेट अँड वाॅच”ची भूमिका घेतल्याचे दिसत त्यामुळे भाजप नेमकी कोणाला उमेदवारी देते याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

भाजप सध्या प्रतीक्षेच्या भूमिकेत असला तरी आरक्षणानंतर त्यांच्या हालचाली निर्णायक ठरू शकतात.
महायुती (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) एकत्र लढणार की स्वतंत्र? हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र जर महायुती एकत्रपणे लढली, तर वडगावमधील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकते.

Web Title: Wadgaon maval news attention to the new reservation draw for the post of wadgaon maval mayor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 04:07 PM

Topics:  

  • Local Body Election 2025

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
1

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

मुंबई महापालिकेत ‘दगडी चाळी’चा दबदबा? ‘डॅडीं’ची लेक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
2

मुंबई महापालिकेत ‘दगडी चाळी’चा दबदबा? ‘डॅडीं’ची लेक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू; कशी आहे महायुतीची रणनीती?
3

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू; कशी आहे महायुतीची रणनीती?

Local Body Elections: महापालिका निवडणूक रणधुमाळीला सज्ज! प्रतीक्षा मात्र बिगुल वाजण्याचीच; ९ महीने झाले तरी…
4

Local Body Elections: महापालिका निवडणूक रणधुमाळीला सज्ज! प्रतीक्षा मात्र बिगुल वाजण्याचीच; ९ महीने झाले तरी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.