Maharashtra Politics: "2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र..."; चंद्रकांत पाटलांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर टीका
गौतमी पाटील प्रकरणात देखील केले भाष्य
रोहित पवारांना देखील पाटलांनी सुनावलं
Chandrakant Patil: राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गौतमी पाटील प्रकरण, रोहित पवारांचे ट्वीट, उद्धव ठाकरे आणि अन्य काही विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी रोहित पवार आणि उद्धव ठाकरे यांना चांगलेच सुनावले आहे. कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोर्टातील सगळ्या याचिका संपल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने आता निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समितीवर महायुतीचाच अध्यक्ष झाला पाहिजे. जिल्हा परिषद झाली की आम्ही लगेच महानगर पालिकांच्या तयारीला लागणार आहोत. ”
पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे आपल्यासोबत असले पाहिजेत असे आता म्हणण्यात काही अर्थ नाही. 2014 ते 2019 त्यांना खूप सन्मान मिळाला. मात्र तरी देखील ते यांच्या नेत्यांवर खालच्या भाषेत टीका करताना दिसून येतात. केवळ मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले, याची खंत वाटते.”
गौतमी पाटील प्रकरणात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ” गौतमी पाटीलच्या गाडीने रिक्षावाल्याला उडवलं आणि तो गंभीर जखमी झाला. संबंधित रिक्षा चालकाची मुलगी माझ्या ऑफिसला आली, त्यानंतर मी डीसीपींना फोन लावला. मात्र त्या गाडीमध्ये गौतमी पाटील नव्हती हे समोर आले.” यामध्ये रोहित पवारांनी ट्वीट केले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवारांना सुनावले आहे. पाटील म्हणाले, “रोहित पवार यांना काय काम धंदा आहे. स्वतःची थोडी तरी पत राखून बोललं पाहिजे. मी काय करायला पाहिजे, हे रोहित पवार यांनी शिकवण्याची गरज नाही. -कोणत्या प्रकरणात आम्ही काय भूमिका घेतो, हे ढोल वाजवून सांगायची आम्हाला सवय नाही.
पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवारांचे भाष्य
माननीय चंद्रकांतदादा पाटील,
तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे.
माननीय चंद्रकांतदादा पाटील, तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही.
गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची… pic.twitter.com/eboE6Iqixc — Rohit Pawar (@RRPSpeaks) October 4, 2025
पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही…! आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात. पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल.. पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात?