धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान; म्हणाल्या, 'मला कधीच वाटलं नव्हतं...'
मुंबई : वाल्मिक कराड याने सोलापूर, बारामतीतील शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, या प्रकरणाची चौकशी करून पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिकी कराड याने १४० शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या व्यक्तीचे रोज नवे कारनामे पुढे येत आहेत.खंडणी, अवैध संपत्ती, कलम ३०७ अंतर्गत गुन्हे आणि इतर अनेक अवैध धंदे यामध्ये वाल्मीक कराड या व्यक्तीचा संबंध आहे.… pic.twitter.com/OzMEdWge54
— Supriya Sule (@supriya_sule) January 12, 2025
सुप्रिया सुळे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका शेतकऱ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वाल्मिकी कराड याने फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर मंगळवारी बारामती परिसरातील शेतकऱ्यांना देखील अशाच पद्धतीने सदर व्यक्तीने गंडा घातल्याचे उघड झाले. वाल्मिक कराड हा खंडणी, अवैध संपत्ती, अवैध धंदे, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अपराधी आहे. ईडीनेही त्याला नोटीस पाठवून देखील त्यावर कसलीही कारवाई झालेली नाही.
दरम्यान, देशमुख कुटुंबीय आणि जनतेची तीव्र भावना असूनही शासन सदर व्यक्तीला पाठिशी घालत आहे. हा संपूर्ण प्रकार संतापजनक असून, राज्य शासन सदर व्यक्तीवर अजूनही कठोर कारवाई करताना दिसत नाही. शासन आणि तपास संस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली.
बीड, परभणी प्रकरण तापतंय
राज्यामध्ये बीड हत्या प्रकरण व परभणी प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना घेतले आहे. बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तर परभणीमध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला. यानंतर अनेक राजकारण्यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. आता शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली आहे.
बीड प्रकरणावर खासदार सुळे म्हणाल्या…
बीड प्रकरणात जो आरोपी फरार आहे त्याला तात्काळ पकडले पाहिजे. धनंजय मुंडे यांनी माणुसकीच्या नात्याने आणि नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. पोलिसांना वाल्मिक कराड का सापडला नाही? पोलीस काय करत होते? तो स्वत: शरण आला. वाल्मिक कराड कुठून येतो, हे पोलिसांना माहित होत नाही. हे गृह खात्याचे नाही तर सरकारचे अपयश आहे. राज्याने या सरकारला एवढे मोठे बहुमत दिले आहे, त्याचा सरकारने काहीतरी विचार करायला पाहिजे, असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.