Wardha News: वर्ध्यात पीककर्ज वाटपाला ब्रेक! ११ हजार शेतकऱ्यांनाच रब्बी पीककर्ज, उर्वरित शेतकऱ्यांचे काय?

Wardha Rabbi Crop Loan Distribution : वर्धा जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी २५० कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत ११,५२९ शेतकऱ्यांनाच १७४.०७ कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आहे.
वर्ध्यात पीककर्ज वाटपाला ब्रेक! ११ हजार शेतकऱ्यांनाच रब्बी पीककर्ज
वर्ध्यात पीककर्ज वाटपाला ब्रेक! ११ हजार शेतकऱ्यांनाच रब्बी पीककर्जवर्ध्यात पीककर्ज वाटपाला ब्रेक! ११ हजार शेतकऱ्यांनाच रब्बी पीककर्ज
Published on: 
Updated on: 
  • वर्धा जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वाटपाची संथ गती

  • २५० कोटींचे उद्दिष्ट, प्रत्यक्षात १७४ कोटींचे वाटप

  • ११,५२९ शेतकऱ्यांनाच मिळाले पीककर्ज

वर्धा : जिल्ह्यात रब्बी हंगाम आता संपण्याच्या मार्गावर असताना पीककर्ज वाटपाची आकडेवारी समोर आली आहे. यंदा २५० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ १७४ कोटी ७ लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. म्हणजेच उद्दिष्टाच्या ७० टक्केच कर्जवाटप झाले असून, अनेक शेतकरी अजूनही कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. (Wardha Rabbi Crop Loan Distribution)

वर्धा जिल्ह्यातील २२ हजार ४८५ शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी कर्ज देण्याचे नियोजन होते. मात्र, आतापर्यंत ११ हजार ५२९ शेतकऱ्यांनाच कर्ज मिळाले. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांपर्यंत बँकांचे कर्ज पोहोचलेच नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

पाऊस आणि कर्जमाफीचा परिणाम

यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारली. पाऊस तब्बल महिनाभर उशिरा आल्याने शेतीच्या नियोजनाचे गणित बिघडले. त्यातच राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जुन्या कर्जाचे पुनर्गठन केले नाही. याचाही परिणाम पीककर्ज वाटपावर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वर्ध्यात पीककर्ज वाटपाला ब्रेक! ११ हजार शेतकऱ्यांनाच रब्बी पीककर्ज
Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन

३,८८४ शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन

अल्प पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांपैकी ३ हजार ८८४ शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. या कर्जाची एकूण रक्कम ५२.८९ कोटी रुपये आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

पावसाअभावी यंदा रब्बी पेरणीवरही परिणाम झाला. जिल्ह्यात निश्चित केलेल्या क्षेत्रापैकी फक्त ५५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये ९ हजार ८६३ हेक्टरवर गहू, ४५६ हेक्टरवर ज्वारी, १३० हेक्टरवर मका आणि ८ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी करण्यात आली.

बँकांकडून कर्जवाटप कमी झाल्याची कबुली

जिल्ह्यातील १९ बँकांच्या १५३ शाखांमधून कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत अग्रणी बँकेचे व्यवस्थापक वैभव लहाने यांनी सांगितले की, कर्जमाफीची घोषणा, कर्जाचे पुनर्गठन न होणे आणि रब्बी पेरणी क्षेत्रात झालेली घट यामुळे कर्जवाटपावर परिणाम झाला. मात्र, एकूण कर्जवाटपाची स्थिती समाधानकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकीकडे शेतीचा खर्च वाढतोय, तर दुसरीकडे पीककर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ कधी मिळणार, हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरत आहे.

वर्ध्यात पीककर्ज वाटपाला ब्रेक! ११ हजार शेतकऱ्यांनाच रब्बी पीककर्ज
Wardha News : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची आता खैर नाही! वर्धा पोलिसांचा ११ बीटचा मास्टर प्लॅन, ६१ किमीवर पोलिसांचा पहारा!