सामान्यतः गंभीर दिसणाऱ्या अजित पवारांची वेगळीच बाजू वर्धा येथे कामगारांच्या समोर आली. तत्पूर्वी, अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातील विकास प्रकल्पांचा आढावा घेतला, पहा व्हायरल व्हिडिओ
11 एप्रिलला नागपूर सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून, तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक या कार्यालयामध्ये काम करणारे चार अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले.
वर्ध्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. यामुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
रामदास तडस यांना रामाच्या दर्शनासाठी गर्भगृहात प्रवेश नाकारणाऱ्या ट्रस्टीने माफी मागितली आहे. वर्धाच्या देवळी येथील श्रीराम मंदिरात माजी खासदार रामदास तडस यांना श्रीरामाचे दर्शन नाकारले होते.
सूर्याने आग ओकल्याने जिल्ह्याचे तापमान 41.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर रविवारी दिवसभर जीवाची काहीली होईल असेच उन्ह होते. रविवारी जिल्ह्याचे तापमान 40.2 नोंदविण्यात आले आहे.
अविनाश दोड याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या लग्नासाठी चुलत सासरे बंडू सकंडे यांनी खर्च केल्याचे सांगत लग्नासाठीचा केलेला खर्च परत करण्यासाठी अविनाशकडे बंडू सकंडे यांच्याकडून तगादाच लावला जात होता.
विद्यार्थ्यांच्या खेळाच्या सुविधेचा दर्जा, शाळेतील पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्थेचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, शालेय पोषण आहार या सारख्या विविध विषयाबद्दल मार्गदशन करावे लागणार आहे.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 27 जानेवारी रोजी 2 हजार 500 रुपयांची मागणी सिंदी रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चांदेकर यांनी केली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबी विभागाला माहिती दिली.
शाहीद ईलीयास (वय ३२), हाकमखॉन शाकिरखॉन (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. छार दीपक छाबडा (रा. दिल्ली), कंटेनर मालक अशिना विकास छाबडा (रा. दिल्ली) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
एसटीचे प्रवासी उत्पन्न जरी वाढलेले असले तरी त्याप्रमाणामध्ये एसटीचा खर्चदेखील वाढलेला आहे. इंधनाचे वाढते दर, टायर व सुट्या भागांच्या दरामध्ये झालेली वाढ याचा प्रतिकूल परिणाम एसटीच्या खर्च वाढीवर झाला आहे.