About five hours of digging in the hospital, what came out?
वर्धा : आर्वी येथील कदम रुग्णालयात अवैध गर्भपात प्रकरणात पीसीपीएनडीटी समितीच्या राज्य सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी भेट दिली. तसेच, या प्रकरणाची तथ्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. येथे घडलेल्या प्रकारामुळे रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
[read_also content=”धक्कादायक – वर्ध्यात दही समोसा खाल्ल्याने ११ लोकांना अन्नबाधा, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु https://www.navarashtra.com/wardha/vidarbha/wardha/11-people-affected-by-food-poisoning-in-wardha-after-eating-curd-and-samosa-in-hotel-nrsr-218718.html”]
१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्या प्रकरणी पोलिसांच्या नजरेत असणाऱ्या कदम रुग्णालयात आज पुन्हा खोदकाम करण्यात आले. आज या रुग्णालयाच्या आवारातील विहिरीत सुमारे पाच तास खोदकाम सुरु होते. विहिरीच्या खोदकामात काय सापडले याबाबतची कसलीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली नाही. मात्र, ब्लड सँपलसोबत काही साहित्य तपासणीसाठी नेल्याची माहिती मिळत आहे. तसेच, वर्धा आणि नागपूर येथील फॉरेन्सिक टीमने रुग्णालयाची पूर्ण पाहणी सुद्धा केली आहे. विहिरीत खोदकामाला सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे.
[read_also content=”कदम रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, गोबर गॅसच्या टाकीत सापडले अर्भकांच्या हाडांचे अवशेष https://www.navarashtra.com/wardha/vidarbha/wardha/kadam-hospital-shocking-news-remains-of-infant-bones-found-in-dung-gas-tank-222114.html”]
काय आहे प्रकरण ?
वर्धा जिल्ह्यातील आर्वीतील कदम रुग्णालयातून काल अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. या रुग्णालयाच्या परिसरातून गर्भपात करण्यात आलेल्या अर्भकाचे अवशेष सापडले आहे. तर या रुग्णालयातील आवारात चक्क गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या अकरा कवट्या आणि पंचावन्न हाडांचे अवशेष सापडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्भकांचे अवशेष सापडल्याने या प्रकरणाला गंभीर वळण प्राप्त झाले. या रुग्णालयावर आधीपासूनच एका १३ वर्षीय मुलीचा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी कारवाई सुरु आहे. गर्भपात प्रकरणात रुग्णालयाच्या संचालिका डॉ. रेखा कदम आणि परिचारिका संगीता काळे यांना अटक झाली आहे.