
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या सातही तलावांमध्ये ८८.१० टक्के पाणी जमा झाले आहे. पालिकेचे चार तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. तर इतर तीन तलावांमध्येही पर्याप्त पाणी साचले आहे. पालिकेच्या अहवालानुसार, सातही तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ मिलियन लीटर पाणी जमा झाले आहे.
या तलावांमधील पाण्याचा ऑक्टोबरमध्ये आढावा घेतला जातो. तलावांमधील साचलेल्या पाण्याच्या निरीक्षणानंतर पाणीपुरवठा करण्याचा आराखडा तयार केला जातो. सप्टेंबरअखेरपर्यंत जर तलाव तुडूंब भरले तर पुढील आठ महिन्यांसाठी पाणी पर्याप्त होते. त्यानंतर पाण्याची कमतरता भासू लागते.
मुंबईच्या सातही तलाव भरले आहेत. १३ जुलैला मोडक सागर, १४ जुलैला तानसा आणि १६ जुलैला तुळशी तलाव ओव्हारफ्लो झाला होता. त्यानंतर १९ जुलैला मध्य वैतरणा तलावाचे दोन स्िपल वे गेट खोलण्यात आले होते. परंतु, हा तलाव अद्याप ओव्हरफ्लो झालेला नाही. भातसाचेही द्वार खोलण्यात आले हाते. भातसामधून मुंबई पालिकेसाठी ५ लाख ५७ हजार ७०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.
मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. वर्षभरात कमी पाऊस झाला की मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मुंबईला वर्षभर पिण्यासाठी १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाणी लागते. सध्या तलावांमध्ये १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे. तसे, मुंबईला जेवढे पाणी लागते तेवढेच पाणी तलावांमध्ये साठवले जाते. परंतु ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांची पाण्याची गरज पाहता सप्टेंबरपर्यंत अधिक पाणीसाठा होईल, त्यामुळे दोन महिन्यांचा कोटा पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.