मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेल्यामुळं सध्या राज्यात बरेच आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. तसेच राज्य सरकारचा (State government) सर्वजण निषेध करत सरकारच्या नाकर्तेपणामुळं हा प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये (Gujrat) गेल्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडले जात आहे. (Shinde fadnvis government) दरम्यान, यावरुन विरोधक आक्रमक होत सरकारवर हल्लाबोल करत असताना, आता याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर आली आहे. (Eknath shinde reaction on Vedanta project move to gujrat)
[read_also content=”जीतकर हारनेवाले को खोके सरकार कहते है…वेदांता प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात https://www.navarashtra.com/maharashtra/how-to-gone-gujrat-vedanta-foxconn-project-thanking-government-aditya-thackeray-325831.html”]
दरम्यान, मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की, प्रकल्पासंदर्भातील राजकारणात जायचं नाही. पण आमच्याकडून सर्व ऑफर कंपनीला दिल्या गेल्या, दरम्यान, विरोधक टिका व आमच्यावर आरोप करत आहेत मात्र, विरोधकांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं, फॉक्सकॉनवरील आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर आली आहे. विरोधकांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे, मागच्या सरकारमध्ये मी होतो, पण निर्णय घेण्याचा अधिकार माझ्याकडे नव्हता, असं सुद्धा मुख्यमत्र्यांनी म्हटले आहे.