Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”

MMRDA News: एमएमआर क्षेत्रातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर पावले उचलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 19, 2026 | 08:22 PM
ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”
Follow Us
Follow Us:

एमएमआरडीच्या ४८ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी
ठाणे आणि कल्याण या दोन शहरांचा कायापालट होणार
ठाणे शहर मानले जाते मुंबईचे महत्त्वाचे प्रवेशद्वार

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि वाढत्या शहरीकरणाची गरज ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत ४८ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे. या माध्यमातून ठाणे आणि कल्याण या दोन शहरांचा कायापालट होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाण्याला ‘मोबिलिटी हब’ म्हणून विकसित करताना कल्याण हे भविष्यातील प्रगत शहरी केंद्र म्हणून उदयास येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ठाणे शहर हे मुंबईचे महत्त्वाचे प्रवेशद्वार मानून येथे १२ ते १३ हजार कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे १२ किमी लांबीचा ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी २०२६-२७ या वर्षाकरिता ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून याला एकूण १८ हजार ८३८ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

यासोबतच ठाण्यात मेट्रोचे जाळे विकसित करण्यात असून कासारवडवली ते वडाळा मेट्रो ४ , मेट्रो ४-ए (गायमूखपर्यंत विस्तार) आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ या प्रकल्पांमुळे ठाणे-मुंबई कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होईल. ठाणे कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी १ हजार २५ कोटी आणि आनंदनगर-साकेत उन्नत मार्गासाठी ८८० कोटी खर्च केले जाणार आहेत. त्याचबरोबर रायलादेवी आणि मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणासह कोलशेत-काल्हेर खाडी पुलासाठी २१४ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

काँग्रेस-BJP ने मिळून ठरवला महापौर, महाराष्ट्रातील ‘या’ नगरपालिकेत मिळाला एकनाथ शिंदेना झटका!

भविष्यातील नियोजित शहरी केंद्र म्हणून कल्याण-डोंबिवली परिसराचा विस्तार होणार असून येथे २,५०० ते ३,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी १,२३९ कोटींच्या कल्याण रिंग रोड या प्रकल्पाकरिता ६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भिवंडी-कल्याण मेट्रो ५, उल्हासनगर विस्तार ५-ए आणि कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो १४ मुळे कल्याण हे एमएमआरमधील महत्त्वाचे ‘ट्रान्झिट हब’ बनेल. ऐरोली-काटई नाका मार्ग ५८४ कोटींच्या या प्रकल्पामुळे नवी मुंबईशी कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

एमएमआर क्षेत्रातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी युद्धपातळीवर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. प्रदेशातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पोशीर’ आणि ‘शिलार’ या दोन्ही धरणांच्या कामांना तातडीने गती देण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

एमएमआर क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 337 किमी मेट्रो जाळ्यासोबत पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, फ्लायओव्हर, अंडरग्राउंड रस्ते आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा एकत्रित आराखडा राबवण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Dcm eknath shinde said mmrda region development in thane and kalyane traffic metro marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • MMRDA
  • Mumbai News
  • Thane news

संबंधित बातम्या

Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर राजकीय नेत्यांशीही होते जिव्हाळ्याचे संबंध
1

Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर राजकीय नेत्यांशीही होते जिव्हाळ्याचे संबंध

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी
2

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट
3

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?
4

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.