मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केल्यामुळे एसटी महामंडळावर चारही बाजूंनी टीका केली जत आहे. मात्र, अर्थखात्याकडून निधी मिळत नसल्यानेच एसटी महामंडळ आर्थिक संकटात आहे. आम्ही परिवहन खात्याकडे पाठवलेली फाईल अर्थमंत्रालयाकडून परत पाठवण्यात आली. आम्ही अर्थखात्याकडे भीक मागत नाही आमचा अधिकार मागत आहोत. अशा शब्दांत एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. येणाऱ्या पाच वर्षांत २५ हजार बसेस खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी किती एसी बस आणि किती नॉन एसी बस आवश्यक आहेत, याचा सविस्तर आढावा घेतला जाईल,” असही त्यांनी सांगितलं.
यावेळी बोलताना नाईक यांनी अजित पवार यांच्यावरही रोष व्यक्त केला. सरनाईक म्हणाले की, “महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटीकडून दिल्या जाणाऱ्या सवलतीसाठीची रक्कम सरकारकडून आमच्या खात्यावर वेळेवर जमा होत नाही. स्वारगेटमध्ये घडलेल्या प्रकारानंतर आम्ही अधिक जागरूक झालो असून अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेत आहोत. कुठल्याही परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेपूर्वीच होईल, याची काळजी घेतली जाईल. पगारासाठी आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, तर आमचा हक्क मागतो आहोत. पगार वेळेवर मिळत नसेल, तर ती एक शोकांतिका ठरेल,” अशी नाराजी आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. “आमच्या संबंधित फायली थेट आमच्याकडे येतात, ही बाबही चिंताजनक आहे,” असेही ते म्हणाले.
स्वारगेट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आता अधिक सतर्क झालो असून अशा प्रकारच्या चुका पुन्हा घडणार नाहीत, याची काळजी घेत आहोत. नवीन बसगाड्यांमध्ये पॅनिक बटण आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. येत्या पाच वर्षांत २५ हजार नवीन बस खरेदी करण्यास मान्यता मिळाली असून, त्यापैकी किती एसी आणि किती नॉन एसी बसेस लागतील, याचा सविस्तर आढावा घेण्यात येईल,” अशी माहितीही सरनाईक यांनी दिली.
आज सकाळी अजित पवार म्हणाले, कोणत्याही राज्याची परिवहन सेवा ही नुकसानीतच असते. पण आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत जाणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही लवकरच पीपीपी तत्वाचे मॉडेल तयार करू. जेणेकरून एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारेल. आमचे एमडीच्या सुचना दिल्या आहेत, जाहिरातीतून मिळणार उत्पन्न हे फार तोकडे आहे.काही जाहिरातदार २५-३० वर्षांपासून आहेत. पण ते कधी पैसे देतात तर कधी देत नाहीत त्यामुळे यावर्षीपासून जाहिरातीच्या माध्यमातून १०० कोटींचे उत्पन्न मिळालेच पाहिजे, असा आमचा प्रयत्न असणार आहे. जुने ठेकेदार एसटीची मालमत्ता खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे वागत आहेत. त्यांनाही लगाम घातला जाणार आहे.
चीनमध्ये योगाचा वाढता प्रभाव; प्राध्यापक वांग झी चेंग यांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
आमचे 170 च्या आसपास डेपोमध्ये जे ऑईल डिझेल पेट्रोल घेतो, ते इंडियन ऑईल किंवा रिलायन्स सारख्या मोठ्या ब्रँड्सला हायटेक करण्यासाठी देत आहेत. जेणेकरून आम्हालाही आर्थिक फायदा होईल आणि आमचेही उत्पन्न वाढेल, अशा सुचना दिल्या आहेत. एसटी महामंडळाकडून ज्या नवीन बसेस घेतल्या जाणार आहेत, त्यात पॅनिक बटण आणि सीसीटिव्ही कॅमेरे बसवले जातील. ज्या जुन्या बसेस आहेत, त्यातील ५१५० बसेस आम्ही घेतल्या होत्या त्यातील २०० बसेसच मिळाल्या होत्या. त्यातही पॅनिक बटण आणि सीसीटिव्ही कॅमेरे आणि जीपीएस यंत्रणा बसवण्यात येतील. येणाऱ्या बसेसमध्ये त्या बसच्या मालकांनीच ही सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशा सुचना आम्ही त्यांना दिल्या आहेत. पुढील वर्षांत ज्या बसेस येतील त्या महिलांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतील, तसेच, ग्रामीण, शहरी आणि तालुकास्तरावरील बसेसमध्येही मोठ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.