मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्यापासून ( 12 एप्रिल) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते रायगडालाही भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या रोह्यातील निवासस्थानी जाऊन स्नेहभोजनास उपस्थित राहणार असल्याचही माहिती समोर आली आहे. अमित शाहांच्या या दौऱ्यामुळे मात्र राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यातील सरकार स्थापन होऊन चार महिने झाले तरी रायगड जिल्हया पालकमंत्री अद्यापही नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे अमित शाह यांचा तटकरे यांच्या घरी होणारा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री भरत गोगावले यांच्यात नाराजीची चर्चा रंगली आहे.