Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वातावरणात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी कडक उन्हाळा जाणवत आहे. दरम्यान पुन्हा एकदा राज्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर त्याचवेळी राज्यातील काही भागात जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. म्हणजेच कडक उन्हाळ्यात राज्यावर अवकाळी पावसाचे संकट असणार आहे.
मुंबईमधील तापमानामध्ये वाढ होत आहे. तर तापमानात वाढ होत असतानाच मुंबईत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने अंदाज दिला आहे. राज्यात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. विदर्भात तर तापमान ४२ अंशाच्या वर गेले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. भंडार आणि गोंदिया जिल्ह्यांना २८ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान ४४ अंशाच्या यावर पोहोचले आहे. कडक उन्हाळा जाणवत आहे. राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर गरज असल्याच दुपारच्या वलेस घराबाहेर पाडण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भात गारपीट होण्याचा इशारा
राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. लातूर, धाराशीव, नांदेड, सोलापूर भागात पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील दोन दिवस गारपीट होण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत देखील पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुणे तापलं! शहर आणि परिसरात वाढल्या उन्हाच्या झळा
पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा वाढल्या असून तापमानाचा पारा ४२. १ अंश सेल्सिअसपर्यंत पाेचला आहे. पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियस राहणार आहे. त्यामुळे नागरीकांनी घरातुन बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. २२ एप्रिलनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Pune Weather: पुणे तापलं! शहर आणि परिसरात वाढल्या उन्हाच्या झळा; पुढील दोन दिवसांत…
यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा वाढला आहे. दिवसा असलेल्या तीव्र उन्हाच्या झळांमुळे वातावरणातील उष्मा वाढला आहे. त्यामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी शिवाजीनगर येथे ४०.१, कोरेगाव पार्क आणि मगरपट्टा येथे ४०.१, पाषाण येथे ४०, हडपसर येथे ३९.९, चिंचवड येथे ३८.६, एनडीए येथे ३८.२ अंश सेल्सियस तापमान होते. तर शुक्रवारी शिवाजीनगर येथे ४०.५, पाषाण येथे ४०.४, लाेहगाव येथे ४२.९,चिंचवड येथे ३९.२, मगरपट्टा येथे ४० अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नाेंद झाली.