Maharashtra Rain News: ऐन गणेशोत्सवात पाऊस धुमाकूळ घालणार! कोकणासाह 'या' जिल्ह्यांत अतिवृष्टीचा अंदाज
Rain Marathi News: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस कोसळत होता. गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. मात्र एक ते दोन दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र हवामान विभागाने राज्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. कोकण, पश्चिम महराष्ट्र व विदर्भात काही भागात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला होता.
23 Aug, 1.25 pm, Possibility of light to mod thunderstorms during next 3,4 hrs at isolated places over Maharashtra including ghat areas as seen from the latest satellite obs
Pl watch IMD alerts. pic.twitter.com/vHqtZy34QH— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 23, 2025
हवामान विभागाचा अंदाज काय?
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे 25 तारखेपासून महराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, व संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात पाऊस धुमाकूळ घालणार असे चित्र सध्याच्या माहितीनुसार दिसून येत आहे.
चाकरमानी नव्हं ‘कोकणवासीय’ म्हणा
लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे. कोकणातील गणेशोत्सव म्हणजे जगप्रसिद्ध आहे. दरम्यान आता कोंकणी माणसांसाठी शासन दरबारी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने कोकणकरांना एक खुशखबर दिली आहे.
गणेशोत्सव आला की चाकरमानी कोकणाकडे जातात. कोकण गणेशोत्सवाला विशेष महत्व प्राप्त आहे. आरत्या, भजने , लोककला यांचा संगम आपल्याला गणेशोत्सवात कोकणात पाहायला मिळतो. चाकरमानी हा शब्द अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. मात्र हा शब्द बदलण्याची मागणी केली जात होती. या मागणीला आता यश मिळाले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागणीची दाखल घेतली आहे. अजित पवार यांनी प्रशासनाला चाकरमानी ऐवजी कोकणवासीय हा शब्द वापरण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या लोकांना कोकणवासीय म्हणून संबोधले जाणार आहे. याबाबत लवकरच परिपत्रक काढण्यात येणार आहे.
गणेश चतुर्थीचा सण आला की वातावरणात उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरते. प्रत्येक घरात आणि मंदिरात बाप्पांची स्थापना केली जाते तसेच ठिकठिकाणी भव्य पंडाल उभारले जातात. मुंबईतील गणेशोत्सवाचे दर्शन तर जगप्रसिद्ध आहेच, पण देशाच्या इतर अनेक भागांमध्येही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.