कोंकणी माणसांसाठी आनंदाची बातमी (फोटो- सोशल मीडिया)
Konkan Ganeshotsav 2025: लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे. कोकणातील गणेशोत्सव म्हणजे जगप्रसिद्ध आहे. दरम्यान आता कोंकणी माणसांसाठी शासन दरबारी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने कोकणकरांना एक खुशखबर दिली आहे.
गणेशोत्सव आला की चाकरमानी कोकणाकडे जातात. कोकण गणेशोत्सवाला विशेष महत्व प्राप्त आहे. आरत्या, भजने , लोककला यांचा संगम आपल्याला गणेशोत्सवात कोकणात पाहायला मिळतो. चाकरमानी हा शब्द अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. मात्र हा शब्द बदलण्याची मागणी केली जात होती. या मागणीला आता यश मिळाले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागणीची दाखल घेतली आहे. अजित पवार यांनी प्रशासनाला चाकरमानी ऐवजी कोकणवासीय हा शब्द वापरण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या लोकांना कोकणवासीय म्हणून संबोधले जाणार आहे. याबाबत लवकरच परिपत्रक काढण्यात येणार आहे.
भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव
गणेश चतुर्थीचा सण आला की वातावरणात उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरते. प्रत्येक घरात आणि मंदिरात बाप्पांची स्थापना केली जाते तसेच ठिकठिकाणी भव्य पंडाल उभारले जातात. मुंबईतील गणेशोत्सवाचे दर्शन तर जगप्रसिद्ध आहेच, पण देशाच्या इतर अनेक भागांमध्येही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रस्ते, चौक सजवले जातात, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तांची गर्दी सर्वांना मोहून टाकते. जर तुम्ही गणेश चतुर्थीच्या काळात प्रवासाचा विचार करत असाल, तर मुंबई व्यतिरिक्तही काही ठिकाणे अशी आहेत जिथे गणेशोत्सवाची झलक वेगळ्याच उत्साहाने अनुभवता येते. चला तर जाणून घेऊया या खास ठिकाणांविषयी.
यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार
वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा सज्ज झाली असून गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकाचौकात रोशनाई, ड्रोन शो, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. यावेळी प्रथमच राज्य शासन उत्सवात सहभागी होणार असून यासाठी शासनाने सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.