Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rupali Thombare News: ‘तुम्ही काय आपटणार आम्हीच तुला आपटू’; दुबेंच्या टीकेनंतर अजित पवारांच्या वाघिणीने डरकाळी फोडली

हिंदी भाषेच्या सक्तीकरणाविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. तसेच हिंदी भाषा सक्ती करू नये असे आवाहनही केले

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 07, 2025 | 05:39 PM
Rupali Thombare News: ‘तुम्ही काय आपटणार आम्हीच तुला आपटू’; दुबेंच्या टीकेनंतर अजित पवारांच्या वाघिणीने डरकाळी फोडली
Follow Us
Close
Follow Us:

Three Language Policy :  “तुमची ही भाषा झारखंडमध्ये वापरा, महाराष्ट्रात नाही. मराठी माणूस का बाहेर पडेल? तो जेव्हा दुसऱ्या राज्यात काम करतो, तेव्हा ती त्याची कर्मभूमी असते. अमराठी लोकांनीही महाराष्ट्रात यावं, पण मराठी भाषा शिकावी आणि तिचा सन्मान करावा,  निशिकांत दुबे हे आमच्या मित्रपक्ष भाजपचे खासदार असले तरी त्यांनी मराठीबद्दल अश्लाघ्य भाषेत बोलू नये,” अशा शब्दांत  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी इशारा   दिला आहे.

हिंदी भाषेच्या सक्तीकरणाविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. तसेच हिंदी भाषा सक्ती करू नये असे आवाहनही केले. त्यांतर भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकाही केली. निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंना तर थेट धमकीच दिली.

“म्हणून हे फडतूस कॅरेक्टर बोलू लागतात…; भाजप खासदार निशिकांत दुबेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “ठाकरे बंधू घाणेरडं राजकारण करत आहेतजर तुम्ही खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असाल, तर माहीम दर्ग्यावर जा आणि तेथील उर्दू भाषिकांवर कारवाई करून दाखवा. तुमच्या घरात सिंह आहे म्हणता, मग हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात या. महाराष्ट्राबाहेर पडा, आम्ही तुम्हाला आपटून आपटून मारू आणि दाखवून देऊ.” अशा शब्दांत इशाराच दिला.  दुबे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे यांनी निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर रुपाली ठोंबरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “दुबे हे आमच्या मित्रपक्ष भाजपचे खासदार असले तरी त्यांनी मराठीबद्दल अश्लाघ्य भाषेत बोलू नये,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, “तुमची भाषा झारखंडमध्ये वापरा, महाराष्ट्रात नाही. मराठी माणूस का बाहेर पडेल? तो जेव्हा दुसऱ्या राज्यात काम करतो, तेव्हा ती त्याची कर्मभूमी असते. अमराठी लोकांनीही महाराष्ट्रात यावं, पण मराठी भाषा शिकावी आणि तिचा सन्मान करावा,” असं ठोंबरे यांनी म्हटलं.

रिअल तो रिअल होता हैं! नीना गुप्ताने दाखवली ‘लक्ष्या’ने दिलेली ‘ती’ खास भेट, प्रिया बेर्डे झाली भावुक म्हणाली…

त्याचबरोबर, “बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करावी. भाजपच्या खासदारांना लगाम घालावा. आणि जर ते शक्य नसेल, तर बिस्तर उचला आणि निघा,” अशा कठोर शब्दांत ठोंबरे यांनी संताप व्यक्त केला. “तू काय आपटून मारशील? तुला आम्ही आपटून दाखवू, तुम्ही  झारखंडचे   आहात तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीही बोलू शकतात. अशा प्रवृत्तींचा तीव्र निषेध केला पाहिजे. इथे येऊन काम करायचं आणि नंतर मराठी माणसांविरुद्धच बोलायचं, हे खपवून घेतलं जाणार नाही,” असं ठोंबरे म्हणाल्या.

तसंच, “बाहेरून येणाऱ्यांनी मराठी भाषेचा सन्मान केला पाहिजे. महाराष्ट्रात राहायचं, तर मराठीची अस्मिता जपली पाहिजे. दुबे यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा महाराष्ट्रात आल्यास जनतेकडून तीव्र प्रतिक्रीया मिळू शकते,” असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: What will you do we will beat you up ajit pawars warlords response to dubeys criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 05:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.