राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या (अजित पवार ) पुणे पुर्व शहर विभागाची जम्बाे कार्यकारणी जाहीर झाली आहे. यामध्ये ३९ उपाध्यक्ष, २२ सरचिटणीस, १७ शहर चिटणीस, २० संघटक सचिवांसह इतर पदांचा समावेश आहे.
पुण्यात सध्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, राष्ट्रवादीकडून तातडीने कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.
हिंदी भाषेच्या सक्तीकरणाविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. तसेच हिंदी भाषा सक्ती करू नये असे आवाहनही केले