समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; जखमींना बाहेर काढताना आणखी एक अपघात
अचलपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आली. एका शाळकरी मुलांनी भरलेल्या बसचे चाक रस्त्याच्या मध्येच निखळले. ही घटना शनिवारी (दि.15) अचलपूर ते वरुड येथील मुकेरीपुरा नगर परिषद उर्दू शाळेतील मुलांच्या सहलीदरम्यान घडली.
रिद्धपूरजवळ चालकाच्या बाजूचा टायर अचानक निखळला. चालक अतुल धाकडे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या दुर्लक्षाबाबत स्थानिक नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. प्रत्येकवेळी बसचालक व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी का निश्चित केली जात नाही? उल्लेखनीय म्हणजे याआधीही चिखलीजवळ बसचे टायर निघाला होता.
त्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. बसेसची नियमित तपासणी होत नाही का? रिद्धपूरजवळ अचानक टायर निखळल्याने बसमध्ये गोंधळ उडाला. मात्र, चालक अतुल धाकडे यांनी सतर्कता दाखवत बसवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे मुलांचे प्राण वाचले. पण या घटनेने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. बसेसची नियमित तपासणी करावी, तसेच निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
परांडा तालुक्यातील सोनारीजवळ भीषण अपघात
परांडा तालुक्यातील सोनारीजवळ एक भीषण अपघात झाला. एसटी बसचा मोठा अपघात झाला असून, या अपघातात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय, इतर पाचजण किरकोळ जखमी झाले. या बसमध्ये 18 प्रवाशी बसले होते. प्रवासी व विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत. ही घटना परंडा तालुक्यातील सोनारीमधील हरणवड्याजवळ घडली. रोहकलहून परंड्याला जात असताना एसटी बसचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच सोनारी व कंडारी येथील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथील तात्या वीरभद्रा पाटणे (वय 59) असे अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.