Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रूग्ण’ वाचवणारी वाहिकाच रस्त्यावर कोलमडली अन् उपस्थितांच्या हृदयाचा…; सिंधुदुर्गमध्ये घडले काय?

क्षणभरासाठी मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती. रुग्ण नसल्याने मोठी जीवितहानी टळली; परंतु हा प्रकार पाहून उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 27, 2026 | 02:24 PM
‘रूग्ण’ वाचवणारी वाहिकाच रस्त्यावर कोलमडली अन् उपस्थितांच्या हृदयाचा…; सिंधुदुर्गमध्ये घडले काय?
Follow Us
Follow Us:

गाडीची तपासणी करण्याची मागणी 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली मोठी दुर्घटना 
रुग्णांच्या जीवाशी खेळ

सिंधुदुर्गनगरी: रुग्णांच्या जीवासाठी धावणारी १०८ रुग्णवाहिका स्वतःच रस्त्यावर कोलमडली आणि क्षणभरासाठी उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकला. वेंगुर्ला येथील १०८ रुग्णवाहिका सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण सोडून परत वेंगुर्त्याकडे जात असताना जिजामाता चौकात अचानक मागील दोन्ही चाके निखळून पडली. सायंकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. सुदैवाने त्या वेळी रुग्णवाहिकेत रुग्ण नव्हता. मात्र चालक आणि डॉक्टर वाहनातच होते.

रुग्णाच्या जीवाशी खेळ 
क्षणभरासाठी मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती. रुग्ण नसल्याने मोठी जीवितहानी टळली; परंतु हा प्रकार पाहून उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही १०८ सेवा भारत विकास ग्रुप कंपनीमार्फत दिली जाते. वाहनांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती केली जाते की नाही, असा गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.

Accident News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी; लोखंडी साहित्य थेट…

गाडीची तपासणी करावी
रुग्णवाहिका म्हणजे जीव वाचवण्याचे साधन; परंतु अशा प्रकारे चाके निखळणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्यासारखे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. जर त्या वेळी गंभीर अवस्थेतील रुग्ण वाहनात असता, तर काय अनर्थ घडला असता, याची कल्पनाही करवत नाही. रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने आणि संबंधित कंपनीने तातडीने लक्ष घालून सर्व रुग्णवाहिकांची तपासणी करावी, अशी मागणी पुढे येत आहे. जीव वाचवण्यासाठी धावणारी रुग्णवाहिका रस्त्यावर थांबली, हा प्रकारच संपूर्ण यंत्रणेसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

Accident News: भीषण ट्रक अपघात चालकाचा मृत्यू; राजापूरमधील घटना

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील रावतळे-विंध्यवासिनी रस्त्यानजिक गुरुवारी (दि. २६) सकाळी नऊच्या सुमारास लोखंडी सामान वाहून नेणारा टेम्पो अचानक पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. संबंधित टेम्पोमधील लोखंडी साहित्य गाडीच्या दर्शनी भागाकडून घसरत थेट महामार्गावर पसरले. त्याच वेळी मागून येणारा दुचाकीस्वार या साहित्याच्या अंगावर पडण्यापासून थोडक्यात बचावला. प्रसंगावधान राखत त्याने वाहन बाजूला घेतले. दरम्यान, शाळेची बसही त्या मार्गान जात होती. रस्त्यावर पडलेल्य साहित्यामुळे बसचालकाला वाहन वळस घालून पुढे न्यावे लागले.

Web Title: Ambuloance both wheels on damage vengurla no casualty accident sindhudurg news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Accident News
  • Ambulance
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प
1

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प

Sindhudurga: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावे संवेदनशील जाहीर; पाच तालुक्यांचा पश्चिम घाट…
2

Sindhudurga: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावे संवेदनशील जाहीर; पाच तालुक्यांचा पश्चिम घाट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.