अहमदमनगर: भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या उमेदवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे अहमदनगरचं राजकारणही चांगलंच तापलं होतं. त्यानंतर आता वसंतराव देशमुख यांना संगमनेर पोलिसांनी अटक केली आहे.
दोन दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी सुजय विखे पाटील यांची संगमनेरमधील धांदरफळ येथील सभा झाली. या सभेत विखे पाटील यांचे समर्थक वंसतराव देशमुख यांनीही भाषण केले. यावेळी बोलताना वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे संगमनेरमधील राजकारण चांगंलच तापलं होतं.
हेही वाचा: तोतया आयपीएस अधिकाऱ्याकडून व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल एक कोटी लुबा़डले
वसंतराव देशमुख यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर संगमनेरमध्ये हिंसाचार उफळला. सभेत सहभागी झालेले अनेक नेत्यांवर टिकेची झो़ड उठू लागली. दगडफेक झाली, वाहने जाळली गेली. संगमनेर पोलिस (Police) ठाण्यात वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पण विखे पाटील यांच्या सभेतील भाषणानंतर वसंतराव देशमुख पसार झाले होते. त्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेत होते.
वसंतराव देशमुखांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही रवाना झाले. त्यानंतर आज वंसतराव देशमुख यांना आज संगमनेर पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले. वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांविषयी केलेले आक्षेपार्ह विधाने सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली होती. महाविकास आघाडीसोबतच महायुतीतील नेत्यांनीही वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध केला. विशेष म्हणजे सुजय विखे पाटील यांनीही त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला . वसंतराव देशमुख यांच्या विधानाच आणि भाजपच कोणताही संबंध नसल्याचेही सांगण्यात आले. त्याचवेळी त्यांच्यावर कारवाई कऱण्याची मागणीही करण्यात आली. तसेच आपण पोलिसांना या प्रकरणात सर्व सहकार्य करू असेही विखे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.
हेही वाचा: पुण्यात बंडखोरीचे चित्र; कॉंग्रेस महिला नेत्याचा पक्षाला रामराम,धंगेकरांना देणार आव्हान
भाऊसाहेब थोरात यांची नात… ती तर बोलती म्हणत्यात… माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाले हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं वसंतराव देशमुख म्हणाले. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला आहे.
जयश्री थोरात यांच्यावर वादग्रस्त टीका झाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय़्या आंदोलन केले. रात्रभर त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून होत्या. पोलिसांकडून कारवाई करण्यासाठी दिरंगाई झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे संगमनेर तालुका पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. या प्रकरणी आचारसंहिता असताना जमाव बंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यासह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता भंग करत जमावबंदी आदेशाचा उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.