शरद पवार पुण्यात येण्यापूर्वीच जयंत पाटील-अजित पवारांमध्ये भेट
मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची संधी आहे. मात्र, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. रविवारी भाजपने आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली होती. आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेसाठी मतदान २७ मार्च रोजी होणार आहे, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार हा शेवटचा दिवस आहे. त्याआधी भाजपने आपल्या तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. आज दोन्ही पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी कुणाला संधी मिळणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यापैकी एकाला विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या उमेदवारासंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाची बैठक पार पडली.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ही बैठक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण विधान परिषद निवडणुकीसाठी योग्य आणि प्रभावी उमेदवार निवडणे ही त्यांच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार अशा नेत्याला संधी देऊ इच्छित आहेत, जो पक्षाच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल.
धानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या एका जागेसाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 17 मार्च हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, आतापर्यंत 100 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानपरिषदेच्या दोन जागा असून, त्यापैकी एक जागा राज्यपाल नियुक्त कोट्यातून पक्षाला मिळणार आहे, तर दुसरी जागा आमदारांमधून निवडली जाणार आहे.
‘ही’ 5 लक्षणं असणाऱ्या Toxic लोकांपासून लांबच राहा, अन्यथा कधी तुम्हाला गुंडाळतील हे कळणारच नाही
अजून पक्षांतर्गत अंतिम निर्णय झालेला नसला तरी बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झीशान सिद्दिकी यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र, काहींनी विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा संधी देण्यास विरोध दर्शवला आहे. दरम्यान, झीशान सिद्दिकी यांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला, त्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या.