मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नाराज नेत्यांना खुष कऱण्य़ासाठी त्यांची महामंडळांवर नियुक्ती केली. यात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना थेट एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. पण ते पदभार स्वीकारतील की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण पदभार स्वीकारू,असेही त्यांनी सांगितले होते. पण अजूनही त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, भरत गोगावले यांनी एसटी महामंडळाचा पदभार स्वीकारलानसल्याचे सांगत त्यांनी खंचही व्यक्त केली होती.पण अलीकडेच मंत्री आदिती तटकरे यांनी नवनिर्वाचित एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कलेला सत्कार मात्र भरत गोगावले यांनी स्वीकारला.पण त्याचवेळी आदिती तटकरे यांच्या मंत्रिपदामध्ये ढवळाढवळ न करण्याची मिश्कील टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा: एअर मार्शल अमर प्रीत सिंग होणार भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; जाणून घ्या त्यांच्या इतर कामगिरी
भरत गोगावले म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांनी मला एसटी महामंडळाचे अध्यक्षपद दिलं असलं तरी मी ते अजूनही स्वीकारलेलं नाही. पण जे मिळालं आहे ते घ्या असं सर्वजण म्हणत आहेत. आदितीताईंच्या मंत्रीपदात ढवळाढवळ करून नका, पण त्यात काळजी कऱण्याचे कारण नाही. असंही भरत गोगावले यांनी म्हटले आहे. तसेच, पुन्हा निवडून आलो की तेव्हा आम्ही दोघेही मंत्री असून,असंही गोगावले यांनी यावेळी स्पष्ट केलं.
भरत गोगावले यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यावेळी बोलताना गोगावले म्हणाले होते की, मी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. पण हे पद देण्यात आता खूप उशीर झाला आहे.राज्याच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना हा पदभार स्वीकारायचा की नाही, हे ठरवेल.
हेही वाचा:मोहोळमध्ये नेमकं काय झालं की अजित पवारांनी आपल्या प्रवक्त्याला झापलं…?