जातीनुसार जनगणना का महत्त्वाची? ऐका राहुल गांधीचं संविधान सन्मान संमेलनातील दमदार भाषण
लोकसभा निवडणुका आणि भारत जोडो यात्रेदरम्यान कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला आहे. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वान दिलं आहे. दरम्यान आज नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलनातही त्यांनी याच मुद्द्यावर अधिक भर दिला होता. जातनिहाय जनगणना का महत्त्वाची आहे, याबद्दल सविस्तर आपलं मत मांडलं आहे.
LIVE: मा. श्री. राहुलजी गांधी, संविधान संमेलन
कविवर्य सुरेश भट ऑडीटोरीयम, नागपूरhttps://t.co/mCTlQ9R6JO
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 6, 2024
देशातील सर्वसाधारण जातीतील लोकं सांगतात की सध्या तरी जात आम्हाला कधी दिसली नाही. पण या सवर्ण जातींमधील लोकांनी ती पाहिली तर दिसेल. दलित, आदिवासी आणि मागास समाजाला मात्र तर ती रोज दिसते. त्यांना यातून रोज जावं लागतं. कामाच्या ठिकाणी असेल, शिक्षणात, नोकरीत, इतकंच नाही तर ते ज्या भागात राहतात, त्या भागातही त्यांना याची पदोपदी जाणीव होते. त्यामुळे जातजनगणना झाली तर खऱ्या अर्थाने प्रत्येक समाजाला न्याय मिळेल.
जातीनुसार जनगणना केली तर देशाचं सर्व चित्र स्पष्ट होईल. प्रत्येकाला समजेल कोणाच्या हाती किती पैसा आहे. मला खात्री आहे की जेव्हा हे होईल त्यात दलित, आदिवासी, मागास असे कुणीही देशाच्या पुंजीमध्ये आपल्याला दिसणार नाहीत. जातनिहाय जनगणना हा विकास करण्याचा एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतीक पातळीवरचे एक अर्थतज्ज्ञ आहेत त्याच्याशी चर्चा केली, भारतात मोठी असमानता पहायला मिळते, असं त्यांनी म्हटलं. त्यावर मी त्याला म्हटलं की तुम्ही मला जे सांगितलं त्यात जात हा शब्द वापरलेला नाही. ज्यातून असमानतेचा मुद्दा सुरु होतो.
हेही वाचा-Jammu- Kashmir Politics: जम्मू-कश्मीर विधानसभेत राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर
संविधान सन्मान संमेलनांमधून महात्मा गांधी ,शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, तुकाराम महाराज, शाहू महाराज, बिरसा मुंडा, भगवान बुद्ध यांचं, त्यांच्या विचारांच स्मरण करतो. मात्र ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गाधी यांचा विषय येतो, त्यावेळी तो एका व्यक्तीचा विषय नसतो. कोट्यवधी जनतेचा तो आवाज असतो. आंबेडकरांच्या पुस्तकांमधून बरचं काही शिकायला मिळालं, शिकायला मिळालं. ते नेहमी सर्वसामान्यांविषयी बोलत असतं असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
संविधान केवळ एक पुस्तक नाही, तर जगण्याचा मंत्र आहे. फुले-बुद्धांचा आवाज आहे. समानता, जाती-धर्माचा आदर आहे. शिक्षण, आरोग्य व्यवस्था, जगण्याचा अधिकार आणि हजारो वर्षांपूर्वीचाही विचार आहे. मात्र आरएसएसला समोरासमोर लढता येत नाही कारण, समोरासमोर त्यांचा कधीच निभाव लागणार नाही. जर लढले तर ते पाच मिनिटात पराभूत होतील. त्यामुळे कायम लपून हल्ला करण्याचं काम सुरु आहे.