Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhupen Bora joins BJP : आसामच्या राजकारणात मोठा भूकंप! काँग्रेसची 32 वर्षांची साथ सोडून भूपेन बोरा यांचा भाजप प्रवेश

आसाम निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा आज (दि.22) भारतीय जनता पक्षात (भाजप) औपचारिक प्रवेश केला आहे. यावरुन राजकारण रंगले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 22, 2026 | 03:38 PM
Senior Congress leader Bhupen Kumar Bora joins BJP Assam political News

Senior Congress leader Bhupen Kumar Bora joins BJP Assam political News

Follow Us
Follow Us:

 Bhupen Bora joins BJP : आसाम : आसाममध्ये (Assam News) लवकरच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वीच काँग्रेस पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा आज (दि.22) भारतीय जनता पक्षात (भाजप) औपचारिक प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून यामुळे निवडणुकीमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.  गुवाहाटी येथील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी काँग्रेससोबतचे (Congress Politics) ३२ वर्षांचे नाते तोडले यानंतर त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आसाम प्रदेश काँग्रेस समितीचे (एपीसीसी) माजी अध्यक्ष भूपेन कुमार बोरा भाजपमध्ये सामील झाल्याने आसामच्या राजकारणात खळबळ उडाली. गुवाहाटी येथील महत्त्वाच्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सैकिया, खासदार बैजयंत पांडा आणि राज्यमंत्री जयंत मल्ल बरुआ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. बोरा यांचे भाजपमध्ये सामील होणे हे केवळ काँग्रेससाठी संघटनात्मक नुकसान नाही तर राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या वाढत्या प्रभावाचे प्रतिबिंब आहे.

हे देखील वाचा : अनिकेत तटकरेंनी केले DCM सुनेत्रा पवारांच्या गाडीचे सारथ्य; सुषमा अंधारेंनी साधला निशाणा

३२ वर्षांचे नाते हे रक्ताने माखलेले

भाजपमध्ये सामील झाल्यानंतर लगेचच भूपेन बोरा यांनी काँग्रेस नेतृत्वावर, विशेषतः राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. पुढे भूपेन बोरा म्हणाले की, त्यांनी ३२ वर्षे पूर्ण प्रामाणिकपणा आणि सचोटीने पक्षाची सेवा केली आहे, परंतु काँग्रेस पक्ष आता त्याच्या मूळ मूल्यांपासून दूर गेला आहे. एका धक्कादायक विधानात बोरा म्हणाले, “आज मी जे कपडे घातले आहेत ते माझ्या रक्ताने माखलेले आहेत. हे रक्त राहुल गांधींच्या उपस्थितीत सांडले गेले.” असे गंभीर वक्तव्य भूपेन बोरा यांनी केले आहे. त्यामुळे तर्क वितर्कांना उधाण आले. भूपेन बोरा यांनी आरोप केला की काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अभिमान आणि स्वाभिमानाच्या बाबींवर तडजोड करत आहे, जे “राष्ट्रवादी” म्हणून ते स्वीकारू शकत नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की त्यांचा निर्णय हा केवळ क्षणिक प्रयत्नांचा परिणाम नव्हता, तर खोल आत्मपरीक्षणाचा परिणाम होता.

हे देखील वाचा : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये पडली वादाची ठिणगी? मनसे-शिवसेना वादावर संजय राऊतांचे सूचक विधान

राहुल गांधींचे प्रयत्न अयशस्वी

भूपेन बोरा यांच्या भाजप पक्षप्रवेशाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी गुवाहाटी येथे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यावेळी बोरा यांनी ही भेट “सौजन्य भेट” म्हणून वर्णन केली असली तरी, त्या भेटीत त्यांच्या भविष्याचे संकेत मिळाले होते. यामुळे चर्चांना उधाण देखील आले

मीडिया रिपोर्टनुसार, बोरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला तेव्हा पक्षाच्या उच्च कमांडने ते स्वीकारले नाही. राहुल गांधींनी त्यांना वैयक्तिकरित्या फोन करून त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आणि अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या निवासस्थानीही गेले. तथापि, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावरील त्यांचा वाढता विश्वास त्यांच्या परतीचे सर्व मार्ग बंद करत होता. अखेर राहुल गांधींचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि बोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 

Web Title: Senior congress leader bhupen kumar bora joins bjp assam political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Assam News
  • BJP Politics
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण
1

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका
2

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
3

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
4

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.