Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“शांतीपूर्ण विरोध करणे हा आता गुन्हाच”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, ‘लोकशाही धोक्यात’ असल्याचा गंभीर आरोप

Rahul Gandhi: "भारतात आता शांतीपूर्ण मार्गाने विरोध करणे हा सर्वात मोठा गुन्हा ठरवला जात आहे," अशा गंभीर शब्दांत राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरून सरकारला घेरले

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 26, 2026 | 06:20 PM
राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल (Photo Credit- X)

राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • “शांतीपूर्ण विरोध करणे हा आता गुन्हाच”
  • राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
  • ‘लोकशाही धोक्यात’ असल्याचा गंभीर आरोप
Rahul Gandhi On Modi Goverment: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका करत देशातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. “भारतात आता शांतीपूर्ण मार्गाने विरोध करणे हा सर्वात मोठा गुन्हा ठरवला जात आहे,” अशा गंभीर शब्दांत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून सरकारला घेरले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला अशा वळणावर नेले जात आहे, जिथे असहमतीला ‘देशद्रोह’ आणि प्रश्न विचारण्याला ‘कट’ मानले जात असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

संवैधानिक आवाजाला लाठी आणि तुरुंगवासाची भीती

राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, कोणताही मुद्दा असो, जर कोणी संविधानाच्या चौकटीत राहून सत्ताधाऱ्यांविरुद्ध आवाज उठवला, तर त्याला लाठीमार, खोटे खटले आणि तुरुंगवासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी विविध उदाहरणे देऊन सरकारची कोंडी केली.

आज भारत में Compromised PM के राज में शांतिपूर्ण विरोध करना ही सबसे बड़ा “अपराध” बना दिया गया है। दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र को धीरे-धीरे ऐसी दिशा में धकेला जा रहा है, जहां असहमति को देशद्रोह और सवाल पूछने को साज़िश बताया जाता है। सोचिए – मुद्दा कोई भी हो, अगर आप सत्ता के… — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 26, 2026

ते म्हणाले की, “पेपर लीक प्रकरणाने त्रस्त झालेल्या तरुणांनी जेव्हा आपल्या भविष्यासाठी आवाज उठवला, तेव्हा त्यांना लाठ्यांनी मारहाण करण्यात आली. देशाचा गौरव असलेल्या महिला कुस्तीपटूंनी भाजपच्या बड्या नेत्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी मागितली, तेव्हा त्यांचे आंदोलन चिरडण्यात आले. तसेच, बलात्कार पीडितेच्या समर्थनात इंडिया गेटवर झालेल्या शांततापूर्ण निदर्शनांना प्रशासनाने ‘असुविधा’ मानून दडपले.” अमेरिकेसोबतच्या व्यापारी कराराचा (US Trade Deal) विरोध करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ‘देशविरोधी’ ठरवून अटक केल्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Political News : “चीनला उत्तर देण्याची वेळा आली तेव्हा..; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र

शेतकरी आणि आदिवासींच्या हक्कांची गळचेपी

पर्यावरणाच्या प्रश्नावर बोलताना राहुल गांधींनी लिहिले की, “जेव्हा सामान्य लोक विषारी हवेच्या विरोधात रस्त्यावर उतरले, तेव्हा त्यांच्या चिंतेची ‘राजकारण’ म्हणून हेटाळणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांच्या मागण्या केल्या, तेव्हा त्यांना देशविरोधी ठरवले गेले. अश्रूधुराचे नळकांडे, रबरच्या गोळ्या, पाण्याचे फवारे आणि लाठीमार हेच आता संवादाचे माध्यम बनले आहे.” जल-जंगल-जमिनीच्या हक्कासाठी लढणाऱ्या आदिवासी समुदायालाही संशयाच्या नजरेने पाहिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“मोदीजी, हे उत्तर कोरिया नाही, भारत आहे…”

लोकशाहीच्या व्याख्येवर भर देताना राहुल गांधींनी सरकारला खडेबोल सुनावले. ते म्हणाले, “ज्या लोकशाहीत पंतप्रधान प्रश्नांना घाबरतात आणि असहमती चिरडणे हा शासनाचा स्वभाव बनतो, ती लोकशाही संकटात आहे. प्रश्न विचारणे ही लोकशाहीची कमजोरी नसून ताकद असते. सरकार जेव्हा टीका ऐकते आणि उत्तरदायी राहते, तेव्हाच लोकशाही मजबूत होते.” आपल्या पोस्टच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट इशारा देताना म्हटले की, “मोदीजी, हे उत्तर कोरिया नाही, भारत आहे. जेव्हा सत्ता स्वतःलाच ‘राष्ट्र’ समजू लागते आणि विरोधाला ‘शत्रू’ मानते, तेव्हा लोकशाहीचा अंत होतो.”

Rahul Gandhi Bhiwandi Court:’माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’; राहुल गांधींच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं?

Web Title: Rahul gandhi attacks the central government makes serious allegations that democracy is in danger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Modi government
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

ममता बॅनर्जींना पुन्हा मोठा धक्का! बंगालनानंतर मेघालयातही आता भाजपचं ऑपरेशन लोटस? 13 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा
1

ममता बॅनर्जींना पुन्हा मोठा धक्का! बंगालनानंतर मेघालयातही आता भाजपचं ऑपरेशन लोटस? 13 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा

Eknath Khadse: ‘नाथाभाऊंनी पक्ष उभा केला’ शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; भाजपला दाखवला आरसा
2

Eknath Khadse: ‘नाथाभाऊंनी पक्ष उभा केला’ शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; भाजपला दाखवला आरसा

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?
3

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण
4

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.