इंदापूर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महायुतीकडून निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच भाजपचे इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील अस्वस्थ असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहेत.इंदापूर विधानसभेतून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. पण ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला तिकीट मिळणार असल्याचे सुत्र महायुतीने ठरवले आहे. इंदापूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने हर्षवर्धन पाटील अस्वस्थ असल्याची चर्चा आहेत. त्यामुळे ते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीआहे. विशेष म्हणजे यासंर्भात सुप्रिया सुळे यांनीदेखील सूचक वक्तव्य केलं आहे.
हेदेखील वाचा: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज; केंद्राकडून नव्या पेन्शन योजनेची घोषणा
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हर्षवर्धन पाटील हे राज्याचे मोठे नेते असून ते लवकरच योग्य निर्णय घेतील आणि तो राज्याच्या हिताचा असेल,अशी अपेक्षा आहे. सुप्रिया सुळे यांच्या या सूचक विधानानंतर आता इंदापूर मतदारसंघात राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
खरंतर हर्षवर्धन पाटील भाजपच्या तिकीटावर इंदापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पण महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यामुळे त्यांना या जागेवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहेत. सध्या इंदापूर विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून याठिकाणी दत्तात्रय भरणे आमदार आहेत. महायुतीच्या नव्या फॉर्म्यल्यानुसार ही जागा अजित पवार यांच्याच वाट्याला येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच वेगळा मार्ग निवडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतल्यास, तो भाजपासाठी मोठा धक्का असेल.
हेदेखील वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; ‘लखपती दीदी’ योजनेचा करणार शुभारंभ