फोटो - सोशल मीडिया
पुणे : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरामध्ये महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आंदोलन केली. यावेळी काळ्या फिती व काळे मास्क घालून निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर महायुतीच्या सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी शरद पवार गटाने पुण्यामध्ये आंदोलन केले. जेष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी काळा मास्क लावून बदलापूर घटनेचा निषेध केला. यावेळी शरद पवार यांनी महिलांच्या सुरक्षितेतेची शपथ घेतली. यावरुन राज ठाकरेंनी निशाणा साधला. त्याला आता सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
आंदोलनाचा अधिकार लोकशाहीने प्रत्येकाला
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपकडून देखील बदलापूर घटनेच्या निषेधार्थ व महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलनं सुरु आहे. पुणे भाजपने देखील आंदोलन केले. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही लोकशाही आहे. त्यांनाही आंदोलन करण्याचा हक्क आहे. आम्हाला एक समाधान आहे की, सरकारने आंदोलनकर्त्यांविरोधात आणलेल्या भयानक कायदा आणला होता. आम्हाला समाधान आहे की आमच्या विरोधात का होईना ते आंदोलनाला तरी बसले आहेत. त्यामुळे अशा बाबतीमध्ये अशा वेळी समाजामध्ये चर्चा झाली पाहिजे. याचा निषेध झाला आहे. आमचं सरकार असताना अशा घटना झाल्या आहेत. तेव्हा भाजपने आंदोलनं केली. हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे आंदोलनाचा अधिकार लोकशाहीने प्रत्येकाला दिला आहे. सरकारने ऐकून घेण्याची ताकद असली पाहिजे. असे मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले.
तसेच दौंडमध्ये देखील अत्याचाराची दुर्दैवी घटना झाली. त्यामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी आणि दौंड पोलिसांनी अतिशय योग्य व लवकर कारवाई केली. पोलिसांची ही कारवाई चांगली आहे. या घटनेमध्ये अनेक वर्षे अनेक बळी झाले आहेत. आपापसात मिटवण्यामध्ये अनेक वर्षे गेली. आता या घटनेवर जी शिक्षा होईल याने नराधमांवर वचक बसेल असे मत सुप्रिया सुळे यांनी दौंडच्या घटनेबाबत व्यक्त केले. सरकारने देखील नैतिकता दाखवली पाहिजे.
पवारांवर टीका केल्यावर हेडलाईन होते
राज ठाकरे यांनी शरद पवार यांना सरकार असताना काम करायला हवे असे सुनावले, यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शक्ती कायदा आमच्याच सरकारने आणला होता. महाविकास आघाडीचं सरकार असताना कायदा आणण्यात आला होता ते त्यांना माहिती नसावं. मला यावर आता आश्चर्य वाटत आहे. कारण मला नेहमी वाटायचं की राज ठाकरे हे अत्यंत संवेदनशील नेते आहेत. मागील 25 वर्षांपासून मी राज ठाकरे यांचं शरद पवारांबाबत हेच ऐकत आहे. ही लोकशाही आहे, त्यांना बोलू दे. शरद पवारांवर टीका केल्यावर हेडलाईन होते. ती झालीच.