Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मुलगी देता का मुलगी?” लग्नासाठी तरुणाचे अनोखे आंदोलन; २८ वर्षीय तरुणाच्या मागण्या ऐकून सोलापूरमध्ये चर्चा

लग्न जमत नसल्याने एका २८ वर्षीय तरुणाने चक्क डोईवर बाशिंग बांधून आंदोलन सुरू केले आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. “मुलगी देता का मुलगी?” असा सवाल करत या तरुणाने विवाहासाठी सरकारकडे चार महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 10, 2026 | 04:58 PM
“मुलगी देता का मुलगी?” लग्नासाठी तरुणाचे अनोखे आंदोलन; २८ वर्षीय तरुणाच्या मागण्या ऐकून सोलापूरमध्ये चर्चा

“मुलगी देता का मुलगी?” लग्नासाठी तरुणाचे अनोखे आंदोलन; २८ वर्षीय तरुणाच्या मागण्या ऐकून सोलापूरमध्ये चर्चा

Follow Us
Follow Us:
  • शेतकरी तरुणाचे सोलापूरमध्ये बाशिंग बांधून अनोखे आंदोलन
  • समाजकल्याण विभागामार्फत नोंदणी केंद्राची मागणी
  • विवाहासाठी अनुदान आणि बिनव्याजी कर्जाची मागणी
सोलापूर: “कुणी लग्नासाठी मुलगी देता का मुलगी?” असा उद्विग्न सवाल करत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील २८ वर्षीय तरुणाने अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले. किसनदेव दत्तात्रेय ननावरे असे या आंदोलक तरुणाचे नाव आहे. डोईवर बाशिंग बांधून त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या पूनम गेटसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. शेतकरी आणि बेरोजगार असल्याने लग्न जमत नसल्याची व्यथा त्यांनी या आंदोलनातून मांडली.

“मुलगी देता का मुलगी?” असा सवाल

किसनदेव ननावरे यांच्याकडे सुमारे अर्धा एकर शेती आहे. सध्या ते बेरोजगार असून, या परिस्थितीमुळे आपले लग्न जमत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी आणि बेरोजगार तरुणांच्या विवाहाचा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. डोईवर बाशिंग बांधून केलेल्या या आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची समस्या केवळ वैयक्तिक नसून अल्पभूधारक शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसमोरही हा प्रश्न असल्याचा दावा ननावरे यांनी केला आहे.

हेही वाचा: Pune:“तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस?” म्हणत MPSC विद्यार्थ्याचे अपहरण; गाडीत कोंबले, पुढे जे घडलं ते…

विवाह नोंदणी केंद्राची मागणी

समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. अशा माध्यमातून विवाहासाठी इच्छुक तरुण-तरुणींना योग्य व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी त्यांची भूमिका आहे.

१ लाखांच्या लग्न अनुदानाची मागणी

विवाहबद्ध होणाऱ्या शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना शासनाने १ लाख रुपयांचे लग्न अनुदान द्यावे, अशी मागणीही ननावरे यांनी केली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे विवाहाचा प्रश्न निर्माण होणाऱ्या तरुणांना शासनाने मदत करावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच विवाहानंतर निवाऱ्यासाठी २ लाख रुपयांचे घरकुल मंजूर करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर  स्वावलंबी होण्यासाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी २ लाख रुपयांचे बिनव्याजी आणि विनाजामीनदार कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: Hingoli Crime: वसमत हादरले! ‘पोलिसांचा खबऱ्या’ असल्याच्या संशयातून तरुणाचा गेम; अंधाराचा फायदा घेत थरारक हत्या

आंदोलनाची सोलापूरमध्ये चर्चा

शेतकरी आणि बेरोजगार तरुणांच्या विवाहाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा दावा करत ननावरे यांनी हे आंदोलन केले. त्यांच्या अनोख्या आंदोलनाची सोलापूर जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलनातून उठणार नसल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. आता प्रशासन या मागण्यांकडे कशा पद्धतीने पाहते आणि त्यावर काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Will you give your daughter in marriage a young mans unique protest demands made by the 28 year old spark discussion in solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 04:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.