Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुर्वेदिक पंचकर्म उपचारामुळे महिलेने केली १४ वर्षांच्या वंध्यत्वावर मात

गेली १४ वर्षे गर्भधारणेचे अनेक अयशस्वी प्रयत्न करून घनघोर निराशा पदरी पडलेल्या सौ. माया फुगे यांनी मातृवेद क्लिनिकमधून आयुर्वेदिक पंचकर्मासारख्या प्रभावी उपचारपद्धतीमुळे वंध्यत्वावर उल्लेखनीय विजय मिळवला आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास म्हणजे वंध्यत्वाच्या आव्हानांवर आयुर्वेदाची परिवर्तनशील शक्ती कशी काम करते, याचे एक उत्तम उदाहरण आहे.

  • By Aparna
Updated On: Jul 18, 2023 | 04:49 PM
आयुर्वेदिक पंचकर्म उपचारामुळे महिलेने केली १४ वर्षांच्या वंध्यत्वावर मात
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गेली १४ वर्षे गर्भधारणेचे अनेक अयशस्वी प्रयत्न करून घनघोर निराशा पदरी पडलेल्या सौ. माया फुगे यांनी मातृवेद क्लिनिकमधून आयुर्वेदिक पंचकर्मासारख्या प्रभावी उपचारपद्धतीमुळे वंध्यत्वावर उल्लेखनीय विजय मिळवला आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास म्हणजे वंध्यत्वाच्या आव्हानांवर आयुर्वेदाची परिवर्तनशील शक्ती कशी काम करते, याचे एक उत्तम उदाहरण आहे.

अपत्यप्राप्तीसाठी फार काळ वाट बघणाऱ्या दाम्पत्यांसाठी वंध्यत्व हे भावनिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या प्रचंड थकवणारे असते. माया फुगे यांनी ही लढाई जवळून अनुभवली होती आणि गेली कित्येक वर्षे त्या वेगवेगळ्या अलोपॅथिक उपचारांना अयशस्वीपणे तोंड देत होत्या. पण आयुर्वेदिक उपचारांमध्ये तज्ञ मानल्या जाणाऱ्या मातृवेद क्लिनिकचा त्यांच्या आयुष्यात प्रवेश झाला आणि त्यांचे आयुष्यच बदलून गेले.

मातृवेद क्लिनिकमधील प्रसूती व स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुजित शिंदे वंध्यत्वाच्या उपचारातील आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगतात, “प्रजननसंस्थेचे पुनरुज्जीवन आणि समस्येचे मूळ शोधण्याबरोबरच,आयुर्वेद हे प्रजननक्षमते प्रति एक सर्वांगीण दृष्टीकोन प्रदान करते. प्राचीन ज्ञान आणि वैयक्तिकरित्या घेतल्या जाणाऱ्या काळजीमुळे वंध्यत्वाच्या आव्हानांचा सामना करणाऱ्या दाम्पत्यांच्या आयुष्यात आयुर्वेदिक उपचारांनी आशा आणि आनंद आणला आहे. कित्येक वर्षांपासून निराशे मध्ये अडकलेल्या दाम्पत्यांना पालकत्वाच्या वाटेवर चालताना बळ देतील, असे सर्वसमावेशक आयुर्वेदिक उपचार आम्ही मातृवेद क्लिनिकमध्ये पुरवतो.”

प्रजननक्षम आरोग्याच्या दृष्टीने, भारतीय आयुर्वेद महत्त्वाचा आहे. आरोग्य आणि प्रजननक्षमतेचा विकास करण्यासाठी देह, मन आणि आत्मा यांच्यातील सुसंवादाला महत्त्व देण्यावर आयुर्वेदिक उपचारपद्धती भर देते. व्यक्तिगत उपचारपद्धतींच्या जोरावर वंध्यत्वाची मूळ कारणे शोधून शरीरात संतुलन आणि चैतन्याचे पुनर्संचयन करणे हे आयुर्वेदाचे ध्येय आहे.

मातृवेद क्लिनिकच्या अनुभवी वैद्यांनी माया फुगे यांच्या वैद्यकीय इतिहासाचा बारकाईने अभ्यास केला आणि आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाचा वापर करून त्यांच्यासाठी एक विशिष्ट उपचारपद्धती विकसित केली. आयुर्वेदिक पंचकर्म उपचारपद्धती ही प्रारंभिक आयुर्वेदिक लेखांवर आधारित शुद्धीकरण प्रक्रिया त्यांच्या उपचारपद्धतीची कोनशिला बनली. शरीरातील ताणतणाव तसेच विषारी घटक दूर करून संतुलन आणि आरोग्य वाढवणे तसेच शरीर, मन आणि आत्म्याला टवटवीत करणे हे या उपचारपद्धतीचे उद्दिष्ट आहे.

मातृवेद क्लिनिकच्या या सर्वसमावेशक आयुर्वेदिक उपचारपद्धतीने सौ माया फुगे यांना मातृत्वाकडे नेणाऱ्या प्रवासात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या शरीरातील असंतुलनावर काम करून आणि त्यांची प्रजननसंस्था पुनरुज्जीवित करून आयुर्वेदाने वंध्यत्वाच्या प्रदीर्घ संघर्षावर नैसर्गिक आणि प्रभावी उपाय त्यांना दिला.

आपल्या शरीरातील संतुलन आणि चैतन्य पुनर्संचयित व्हावे या उद्देशाने आयुर्वेदाचा सर्वांगीण दृष्टीकोन अंगिकारत सौ. माया फुगे यांनी अतूट निर्धार आणि परिश्रमाने मातृवेद क्लिनिकच्या आयुर्वेदिक उपचारपद्धतीचे पालन केले. लवकरच त्यांची प्रकृती सुधारली आणि गर्भधारणेची आशा पुन्हा जागृत झाल्याने या उपचारपद्धतीचा परिणाम स्पष्ट झाला.

शेवटी अनेक वर्षांच्या चिकाटीच्या संघर्षानंतर त्यांच्या आयुष्यात तो क्षण आला, जेव्हा त्यांना त्यांच्या यशस्वी गर्भधारणेची बहुप्रतिक्षित वार्ता कळाली. मातृवेद क्लिनिकमधील आयुर्वेदिक उपचारपद्धतीच्या परिणामकारकतेने त्यांना शेवटी मातृत्वाची भेट प्रदान करत त्यांची स्वप्नपूर्ती आणि इच्छापूर्ती केली.

वंध्यत्वावर व्यक्तिगत आयुर्वेदिक उपचार करण्याबाबत मातृवेद क्लिनिकची कुशलता आणि तळमळ सातत्याने दिसून आली आहे. त्यांची याबाबतची हाताळणी, प्राचीन आयुर्वेदिक तत्वे, वंध्यत्वावर समूळ संशोधन आणि शरीरातील संतुलनाचे पुनर्संचयन यामुळे नैसर्गिक गर्भधारणेचा मार्ग आणखीनच सुकर झालेला आहे.

माया फुगे यांची ही यशोगाथा वंध्यत्वाशी लढणाऱ्या अगणित जोडप्यांसाठी आशेचा किरण ठरली आहे. या यशोगाथेमुळे पंचकर्म उपचारांसारख्या अशा आयुर्वेदिक उपचारपद्धतींची संभाव्यता आणखी ठळक झाली आहे, ज्या पारंपरिक उपायांच्या अपयशानंतरही जीवन बदलणारे परिणाम घडवू शकतात.

Web Title: Woman overcomes 14 years of infertility due to ayurvedic panchakarma treatment nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2023 | 04:49 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime: कोंढव्यात झटापटीत गांजा तस्करीतील आरोपीचा मृत्यू; मीरा भाईंदर पोलिसांची कारवाई
1

Pune Crime: कोंढव्यात झटापटीत गांजा तस्करीतील आरोपीचा मृत्यू; मीरा भाईंदर पोलिसांची कारवाई

Diwali 2025: दिवाळीच्या उत्साहाने बाजारपेठा गजबजल्या; खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी
2

Diwali 2025: दिवाळीच्या उत्साहाने बाजारपेठा गजबजल्या; खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी

Rohit Pawar : “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड २० रुपये,” मतदार यादी वादात रोहित पवार यांचा मोठा खुलासा
3

Rohit Pawar : “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड २० रुपये,” मतदार यादी वादात रोहित पवार यांचा मोठा खुलासा

Shivajirao Kardile : सर्वसामान्यांचा नेता हरपला ! सामान्य दूधवाला ते आमदार, राज्यमंत्री झाले,  कोण होते शिवाजीराव कार्डिले?
4

Shivajirao Kardile : सर्वसामान्यांचा नेता हरपला ! सामान्य दूधवाला ते आमदार, राज्यमंत्री झाले, कोण होते शिवाजीराव कार्डिले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.