Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather : शहरापेक्षा उपनगरांची हवा जास्त ‘खराब’! २७ ठिकाणी ‘खराब’ ते ‘अतिखराब’ हवेची नोंद

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा लपंडाव पाहायला मिळत आहे. परिणामी वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 05, 2026 | 11:52 AM
शहरापेक्षा उपनगरांची हवा जास्त 'खराब'! २७ ठिकाणी 'खराब' ते 'अतिखराब' हवेची नोंद

शहरापेक्षा उपनगरांची हवा जास्त 'खराब'! २७ ठिकाणी 'खराब' ते 'अतिखराब' हवेची नोंद

Follow Us
Follow Us:
  • विमानतळ परिसर प्रदूषणामध्ये दुसऱ्या क्रमांकावर
  • शहरापेक्षा उपनगरांची हवा जास्त ‘खराब’!
  • २७ ठिकाणी ‘खराब’ ते ‘अतिखराब’ हवेची नोंद
मुंबई शहर हे प्रदूषणाचे केंद्र मानले जात असले, तरी ताज्या हवा दर्जा गुणांक (एक्यूआय-एअर क्वालिटी इंडेक्स) आकडेवारीने वेगळेच वास्तव समोर आणले आहे. शहराच्या तुलनेत उपनगर आणि लगतच्या नवी मुंबई परिसरात हवेची गुणवत्ता अधिक घसरलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण २७ ठिकाणी ‘खराब’ ते ‘अतिखराब’ श्रेणीतील हवेची नोंद झाली असून, त्यापैकी बहुतांश ठिकाणे ही उपनगरात किंवा
औद्योगिक व वाहतूकदृष्ट्या संवेदनशील भागात आहेत.

यात नवी मुंबईतील नेरूळ येथे सर्वाधिक २०३ एक्यूआय नोंदला गेला असून, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात १७९, तर महापे येथे १७२ एक्यूआय नोंदवण्यात आला आहे. ही आकडेवारी पाहता शहराच्या मध्यवर्ती भागांपेक्षा उपनगरांमध्ये नागरिकांचा श्वास अधिक घुसमटत असल्याचे चित्र दिसून येते.

Bhiwandi Mayoral Election: भिवंडी महापौरपदावर सस्पेन्स कायम; समाजवादी पक्ष ‘नॉट रिचेबल’

बांधकामे, वाहनांची संख्या मुख्य कारण

उपनगरांतील वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणावरील बांधकामे, मेट्रो व रस्ते प्रकल्प, औद्योगिक पट्टे, तसेच वाहनाची संख्या हे प्रदूषण वाढण्यामागचे प्रमुख कारण ठरत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात काही प्रमाणात नियंत्रणात्मक उपाययोजना राबविल्या जात असल्या, तरी उपनगरांमध्ये त्या तुलनेने कमी प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे. आरोग्यावर होणारा परिणाम अधिक गंभीर ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

उपाययोजनाचे परिणाम दिसत नाहीत

हवेची गुणवत्ता अशीच घसरत राहिल्यास श्वसनाचे आजार, हृदयरोग आणि दमा यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरासोबतच उपनगरांवरही तितकेच लक्ष केंद्रीत करून प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. पाण्याने धूळ मारणे, ओपन फायस्वर प्रतिबंध आणणे, मात्र या योजनाचा परिणाम दर दुसऱ्या दिवशी ढेपळताना दिसत आहे. उपनगरांचा श्वास मोकळा करण्यासाठी तातडीची कृती झाली नाही, तर मुंबई महानगर प्रदेशातील पर्यावरणीय संकट अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हवेतील गुणवत्ता निर्देशांक

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स- १७०
घाटकोपर – १५४
मालाड पश्चिम – १५०
नेव्ही नगर कुलाबा – १४९
भायखळा – १४७
मझगाव – १३८
कांदिवली पूर्व – १३७
बांद्रा पूर्व – १३५
सायन – १३३
कुर्ला – १३१

Karjat News : किरण ठाकरे यांच्याकडून 250 कोटींची विकास कामे, माणगावतर्फे वारेडीच्या विकासाचा दावा

Web Title: Weather update news marathi suburban air worse than city air air recorded at 27 locations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • imd
  • maharashtra
  • Weather

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.