Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्या महिलेची समाधी बांधली, तीच वर्षभराने पुन्हा परतली; कुटुंबियांमध्ये आनंदी आनंद

घराच्या उंबरठ्यावर मुक्का कांदो यांना पाहताच पती, मुलगा आणि मुलीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. वर्षभरापूर्वी जिच्या मृत्यूचे दुःख मनात घेऊन समाधी बांधली होती, तीच व्यक्ती आज डोळ्यांसमोर उभी होती. कुटुंबीयांनी त्यांना जवळ घेतले आणि वर्षभराचा विरह एका मिठीत विरघळून गेला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 16, 2026 | 11:53 AM
ज्या महिलेची बांधली समाधी, तीच वर्षभराने परतली

ज्या महिलेची बांधली समाधी, तीच वर्षभराने परतली

Follow Us
Follow Us:

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागडजवळील मोहरली येथील मुक्का दस्सू कांदो (वय ६०) वर्षभरापूर्वी घरातून निघून गेल्या होत्या. कुटुंबीयांनी छत्तीसगडसह विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला. नातेवाईकांकडे चौकशी करूनही त्यांचा पत्ता लागला नाही. अखेर त्या या जगात नसाव्यात, असा समज करून कुटुंबीयांनी त्यांच्या आठवणीसाठी समाधीही बांधली. मात्र, वर्षभरानंतर त्या जिवंत असल्याचे समोर आल्याने कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

भटकंतीच्या अवस्थेत असलेल्या त्यांना नांदेड येथील डोमाजी आधार फाऊंडेशन अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज निवारागृहाचा आधार मिळाला. निवारागृहात त्यांच्या जेवणासह आरोग्याची काळजी घेण्यात आली. आवश्यक वैद्यकीय उपचार तसेच नागपूर येथील मनोरुग्ण रुग्णालयात तपासणी करून उपचार करण्यात आले. दरम्यान, त्यांचा रेस्क्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. हा व्हिडिओ मोहुरलीतील नागरिकांच्या नजरेस पडला. चेहरा पाहताच कुटुंबीयांना त्या मुक्का असल्याचा संशय आला. चौकशी व खात्री केल्यानंतर वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या कांदो जिवंत असल्याचे स्पष्ट झाले.

Satara Voter Registration Camp 2026 : सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर

दरम्यान, ही बातमी कुटुंबीयांसाठी आनंदाच्या अश्रूंनी भरलेला क्षण ठरली. त्यानंतर निवारागृहातील परमेश्वर मळावी, रजनी कुंभारे, मनीष खोब्रागडे, आशिष खोब्रागडे, आदित्य उईके आणि समृद्ध खोब्रागडे यांनी त्यांना वाहनातून मोहुरली येथे नेण्याची जबाबदारी स्वीकारली. जवळपास पाच तासांचा प्रवास करून त्यांना कुटुंबीयांकडे सुखरूप पोहोचवण्यात आले.

…अन् कुटुंबीयांच्या भावनांचा फुटला बांध

घराच्या उंबरठ्यावर मुक्का कांदो यांना पाहताच पती, मुलगा आणि मुलीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. वर्षभरापूर्वी जिच्या मृत्यूचे दुःख मनात घेऊन समाधी बांधली होती, तीच व्यक्ती आज डोळ्यांसमोर उभी होती. कुटुंबीयांनी त्यांना जवळ घेतले आणि वर्षभराचा विरह एका मिठीत विरघळून गेला. एका बाजूला समाधीवर ठेवलेल्या आठवणी आणि दुसऱ्या बाजूला घराच्या उंबरठ्यावर परतलेली जिवंत व्यक्ती.

नियतीचा याहून मोठा चमत्कार दुसरा कोणता असू शकतो? त्यांच्या परतीने केवळ एका कुटुंबाला त्यांची व्यक्ती मिळाली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज निवारागृहाने दिलेला मायेचा हात, माणुसकीची सेवा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेली एक छोटीशी ओळख किती मोठे नाते पुन्हा जोडू शकते, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय आला.

…अशी झाली पुन्हा भेट

सुमारे दोन महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कडेला भटकंतीच्या अवस्थेत असलेल्या मुक्का कांदो डोमाजी आधार फाऊंडेशन नांदेड (ता. नागभीड) च्या पथकाला आढळल्या. पथकाने त्यांना नांदेड येथील छत्रपती शिवाजी महाराज आश्रमात दाखल केले. त्यानंतर रेस्क्यूचा व्हिडिओ आश्रमाकडून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. हा व्हिडिओ दस्सो यांच्या भाच्याने पाहिला आणि वर्षभरापासून हरवलेली आई जिवंत असल्याची बातमी कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. एका क्षणात निराशेचे वातावरण आनंदात बदलले.

Web Title: Woman whose memorial had been built returned a year later incident in gadchiroli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Gadchiroli News
  • Missing Case

संबंधित बातम्या

Indonesia Ship Missing: भीषण दुर्घटना! इंडोनेशियात 240 लोकांना घेऊन जाणारे प्रवासी जहाज बेपत्ता; जावा समुद्रात शोधकार्य सुरू
1

Indonesia Ship Missing: भीषण दुर्घटना! इंडोनेशियात 240 लोकांना घेऊन जाणारे प्रवासी जहाज बेपत्ता; जावा समुद्रात शोधकार्य सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.